सजेतून तुझ्या आता मुक्ती मिळू दे
आठवणीतूनच तुझ्या ही शक्ती मिळू दे.
नको द्वेष माझ्या मनी जराही रूजे दे
तुझ्या प्रेमातूनच जराशी भक्ती मिळू दे.
कसे वागावे जगात आता तरी कळू दे
तुझ्या जगण्यातून ही युक्ती कळू दे.
नको आनंद आणि दु:ख उरात राहू दे
आता नव्याने समंजस व्यक्ती बनू दे.
नको देवा आता हे नाटकी मुखवटे
तुझ्या पाऊली अभंग मुक्त मिळू दे.
Comments
Post a Comment