साधीसुधी माणसं माझ्या
कवितेचा पाया,
साध्यासुध्या माणसांची
साधीसुधी माया.
साध्यासुध्या स्वप्नामधले
साधसुधे गाव,
साध्यासुध्या माणसांच्या
मनाचा ठाव.
साध्यासुध्या जीवनातील
साधेसुधे कर्म,
साध्यासुध्या माणसांच्या
जगण्याचे मर्म.
साध्यासुध्या जीवनाची
साधीसुधी कथा,
साध्यासुध्या माणसांच्या
जीवनाची गाथा.
साधेसुधे येणे आणि
साधेसुधे जाणे,
साध्यासुध्या आठवणींचे
कणभर उरणे.
Comments
Post a Comment