देवा तुझ्या डोईवर माझ्या स्वप्नांचे ओझे
आणि तुझा उंबरा माझ्या पायाने गजबजे.
देवा तुझ्या पाठीमागे माझ्या मागण्यांचे लोंढे
आणि तुझी पायवाट सोडून मी मार्ग शोधे.
देवा तुला नावाला माझ्या नावाचा रे बट्टा
आणि तुझ्या देवळात लागे मागण्यांचा सट्टा
देवा माझ्या आर्जवाने तुझ्या डोळ्यामध्ये पाणी
आणि माझ्या सुकृतांचा शेवटी माझा मीच धनी.
Comments
Post a Comment