संपल्यावर सारे काही
कोणी हात पुढे करते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
धावून थकलेल्या पावलांना
कोणी नवा मार्ग दाखवते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
स्वप्न संपल्या डोळ्यांशी
जेव्हा कोणी डोळे मिळवते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
विरुन गेलेल्या आठवणींना
कोणी दुरून साद घालते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
निर्मल्य झालेल्या फुलाला
कोणी डोई माळू पाहते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
वठलेल्या कल्पवक्षा
कोणी नव्याने जगवू पाहते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
माती झालेल्या माणसाला
कोणी पुन्हा पुन्हा स्मरते
तेव्हा लक्षात येते
याला काही अर्थ नाही.
Comments
Post a Comment