मला जो लागला तुझा लळा आहे
सर्व दुनियेचा त्यावर पहारा आहे.
सावली बघ गोळा झाली झाडाखाली
पांथस्थांचा जणू तो शेवटचा आसरा आहे.
नभाला आस लागली मातीला भेटण्याची
येतो तिच्याही अंगावर शहारा आहे.
तिथे पलिकडे भेटते क्षितीज धरतीला
त्याच्याही स्वप्नपूर्तीचा तोच सहारा आहे.
असेच असतात रंग दुनियेचे झाकलेले
इथे प्रत्येकजण आतून आवारा आहे.
Comments
Post a Comment