दलित पँथरच्या उगमाचा धुरळा खाली बसून जमाना उलटून गेला तरी महाराष्ट्रात पँथरच्या जन्माचे पिक फोफवण्याचे थांबतच नाही आहे,अगदी काँग्रेस गवताप्रमाणे. अशोक जैन यांच्या डोक्यातून "ललित पँथरचा" जन्म झाला त्यालाही काळ लोटला. सोशल साईट्सवर "गळित पँथरचे" पिक दरवर्षी नेमाने घेतले जातेच आहे. जैन यांच्या ललित पँथर मध्ये दोन गट होते एक यशस्वी साहित्याला झोडणारा तर दुसरा सत्यकथेचा द्वेष करणारा. गळित पँथरमध्ये तीन गट असतात, एक समंजस माणसांचा गट,द्वेष सुरवातीला ठीक आहे नंतर मात्र वेगळा मार्ग चोखळवा असे मानणारा. दुसरा द्वेष हाच आपला पाया आहे तो भक्कम ठेवत प्रस्थापितांना झोडणारे. आणि तिसरा दोन्हीमध्ये समतोल साधत याचे पण बरोबर त्याचे पण बरोबर बोलत आपला स्वत:चा पाया भक्कम करणारा. गळित पँथर मध्ये काहीजण असे असतात ज्यांची बोळवण सर्वसामान्य माणसं "चहापेक्षा किटली गरम" या एका वाक्यात करतात. ...
झोप नावाची वस्तू सोबत असेल तर अंथरुण,पांघरुण,उशी अशा सजावटीची गरज पडत नाही. राग,द्वेष,भिती,मत्सर या दिवसभरातील भावनांचे गाठोडे बांधून वळचणीला सरकवून ठेवायला शिकणे हेच ...
ती जन्माला आली तेव्हा शितल गारवा पसरला, तिच्या मुग्ध हास्यातून पारीजात बरसला. ती जन्माला आली तेव्हा आनंदाची बरसात झाली, तिच्या गोड बोलण्यातून शब्दमौतिकांची उधळण झाली....
दिवाळी,चिवडा आणि पोहे. चिवड्याशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण समजला जातो, दिवाळी आली की धावपळ सुरु होते चिवड्यासाठी योग्य पोहे आणण्याची, कोणाला जाड आवडतात, तर कोणाला ...
पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...
कधी कधी आभाळ ही राखाडी होवून जाते, माणसांना ही निवृत्तीची आठवण देत राहते. कोणाच्याही रंगात रंगले तरी निसर्गाकडे जायचे आहे, सर्वकाही इथेच सोडून चिमुटभरच उरायचे आहे.
जगतगुरु तुकोबांना हे असे विषादाने लिहावे लागले तरी इथे स्वयंभू गुरु उगवतच असतात, कुत्र्याच्या ☂️ सारखे आपुला विचार करीन जीवासी काय या जनासी चाड मज ? आपुलें स्वहित जाणित...
आणि मी मांजर झालो--- एक दिर्घ लघूकथा. पहाटे साखरझोपेला दूर सारुन डोळे टक्क जागे झाले, सूर्य अजूनही धुक्याची दाट दुलई पांघरुन लोळत पडला होता. पांघरुणात पडून र...
आयुष्य खुप छोटं आहे मित्रांनो फक्त आपण खुप मोठे विचारवंत असल्याचा आव नाही आणला पाहीजे. जिवनाची शर्यत जेवढी जास्त लांबत जाईल तेवढी पैसा,मान,प्रतिष्ठा,पोस्ट यांची किंमत ...
चित्रांचीही भाषा असते शब्दांना असतात रंग, आपुलकी असेल मैत्रीमध्ये तरच उठतात मनात तरंग. शब्द आणि चित्र यांचे महत्व तेव्हा उरत नाही, जिव्हाळ्याने दोन जीव अबोलपणे बोलतात...
एकदा अशीच प्रश्न ऊत्तरांची लागली होती स्पर्धा, कधी पुढे कधी मागे मारत होते उड्या. कोणीतरी मध्येच येवून प्रश्नाला पाठबळ देई ऊत्तर काही क्षण त्याच्या पुढे निरुत्तर होवू...
सांप्रतच्या काळी भरतखंडामध्ये महाराष्ट्रदेशी, फेसबुक नामें महानगरातील तरुणवर्ग शिवानी नामक देवीची मानसभक्ती करण्यात लिप्त झालेला दिसून येत आहे. या मध्ये माझे बंधू,...
माझ्या भावांनो, वहिनीला समर्पीत.... ****************** सुंदर ते ध्यान दिसे टिव्ही वरी मने सोकावली बघण्याला. मोत्याचे ते दाणे मुखी विलासती उधळण हास्याची करतसे. काळे ते कुंतल डोई शोभा देती ...
*जिवंत राहणे सोपे असते, जगणे कठीण.* *साठवणे सोपे असते, टिकवणे कठीण.* *माणसे जोडणे सोपे असते,संभाळणे कठीण.* *कोणाला आपले म्हणणे सोपे असते कोणाचे आपले होणे कठीण.* *अपेक्षा करणे सो...
मने, तुला चिडवण्यासाठी मंदीचे नाव घेतले, माझ्या भाचीला एवढी आठवण येतेय,उचक्या येवून मरणार बहुतेक मंदी. खुप काही मोठं नसतं मंदी म्हणजे, स्वत:ला आवरायचं आणि वे...
तो मित्र आहे, तो सखा आहे, तो प्रेमी आहे, तो पुत्र आहे, तो भाऊ आहे, तो गुरू आहे, तो शिष्य आहे. मुख्य म्हणजे तो प्रत्येकाचे ऐकून घेणारा आहे, तो प्रत्येकाला समजून घेणारा आहे, तो प्र...
गुगल पण गंडतयं आजकाल. ते पुर्वग्रहदुषीत झालंय. मी बापू सर्च केलं की ते आसाराम बापूंची दाढी दाखवतयं. मी मराठी कीड सर्च केलं की ते इंग्रजी किड्सच्या जन्माची कथ...
शब्द सूचतात तुला पाहून, अन बनते इथे शायरी. अर्थ शोधतो तुझ्या मनीचा, अन बनते खोल चिंतन. शब्द आणि चिंतन मिळूनी अर्थवाही बनते जिवन. नात्यांचे अनेक रंगी रेशिमधागे गुंफू आपण. ध...
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव,पक्ष आणि धर्मासाठी दिवस खर्चले आम्ही. खुप मोठी आग लोकांच्या मनात लागली असणार, ती शांत करण्यासाठी चौकशी आयोग नावाचा यज्ञ आरं...
छोटासी जख्म नासूर बन जाती है.... स्वातंत्र्य मिळतामिळता बंगालच्या मनावर ओरखडा उठला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाली लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पण जेव्हा ला...
साबाजी तुकाजी चिटणीस आणि कृष्णाजी तुकाजी चिटणीस नागांवच्या या दोन सुपुत्रांची आज येण्याचे कारण म्हणजे नागांवमध्ये उद्भवलेली पुरसदृश्य परिस्थिती. १७०७ ते ४ ऑगस्ट १७...