शब्द आणि चित्र एकाच दिवशी मिळावे यासारखा आनंद नाही
तु फुल अमृताचे,मी निर्माल्य सुकृताचे
पुन्हा सुगंध मिळाला,येता तुझ्या कुशीत.
तू पुत्र अमृताचा, मी मानवी विकार
नवजन्म लाभला तो,येता तुझ्या कुशीत.
तु शिखर पर्वताचे, मी वाळवंटी विखार
स्वर्गभुमी झालो, येता तुझ्या कुशीत.
तू ज्ञान देवाघरचे, मी अज्ञान मानवाचे
ज्ञानरुप झालो,येता तुझ्या कुशीत.
Comments
Post a Comment