आसवांना माझ्या अजूनही थोडीशी खंत आहे,
पुर्णपणे विरक्त होण्या मी कुठे संत आहे.
भोगले जे दिधले दैवाने ओंजळीत माझ्या
दैवावर स्वार होण्या मी कुठे महंत आहे.
मिळवले हात नेहमी जे भेटले तयांशी
आयुष्य अजूनही माझे, असे कसे संथ आहे.
केला होता करार त्याने सोबतीच्या माझ्या
आशा अजूनही अंतरी थोडीशी जिवंत आहे.
वाट पाहण्यासाठी अजूनही थोडी उसंत आहे
तरीही कुठेतरी जिवनाला ठरलेला अंत आहे.
Comments
Post a Comment