या चंद्राचे त्या किरणाशी
असे अनामिक नाते,
किरणाच्या नुसत्या स्पर्शाने
याचे प्रकाशित होणे.
युगानुयुगे चालले हे
किरण आणी धरेचे नाते,
तिच्याच मुळे फुलणे
तिच्याच पायी स्तब्ध होणे.
चंद्राचे एकाकीपण
कोळाखाने वेढलेले,
किरणांच्या गोंजारण्याने
कलेकलेने वाढत जाणे.
आकाश आणि धरतीचे नाते
न दिसता ही मानलेले,
तसे तुझे नी माझे प्राक्तन
एकमेकांशी जोडले जाणे.
Comments
Post a Comment