आयुष्याचे मर्म समजले जाता जाता
व्यथांनीही साद घातली जाता जाता.
किती रंग बदलले देवांनीही धरणीवरती
माणसांनी सत्त्व जपले जाता जाता.
भ्रमाचे डोंगर रचले स्वत: भोवती
सत्याची ओळख विसरले जाता जाता.
मार्ग किती ते पक्षांचे ही दाण्यासाठी
घरट्याकडे अचूक वळती जाता जाता.
जगण्यासाठी सर्व लुटले जगताने या
श्वासांचीही किंमत केली जाता जाता
ओलावा अजून टिकून आहे धरणीवरती
किती उन्हाळे असेच सरले जाता जाता.
आयुष्याचे दान मिळाले फुकट सारे
उधळून ते रिक्त झालो जाता जाता.
डोईवरी आता उन्हाळा कायमचा तो
छत्र धरणारे हात सुटले जाता जाता.
Comments
Post a Comment