कितीही रंग तुझ्या स्वप्नात असतील मित्रा
पैशाच्या सावलीतच फुलतो इतिहास मित्रा
नको धावूस सैरावैरा वाटेवर असा उगाच तू
कुणाजवळ नाही तुझ्यासाठी वेळ मित्रा.
संकल्प आणि सिद्धी जोडीने शोभती जरी
त्यासाठी लागते धरावी प्रयत्नांची कास मित्रा.
वर्ष बघ चालले शेवटच्या दिवसाकडे हळुहळु
कॅलेंडर बदलणे एवढेच आपल्या हातात मित्रा.
Comments
Post a Comment