एक शब्द,एक वाक्य
ओठांआड अडतं,
जिवन गाणं बनण्यासाठी
आयुष्यभर झगडत राहतं.
एक आवंढा, एक असू
रेषे आड अडकतं,
मोकळं होण्यासाठी
ओलावा शोधत राहतं.
एक व्यक्ती,एक स्वप्न
हृदया बाहेर राहतं,
हृदय मग स्वागतासाठी
छाया धरुन बसतं.
एक हुंदका,एक भावना
ओठांआड गोठतो,
पुढच्या साऱ्या आयुष्यात
मनावरचे ओझं होते.
एक क्षण,एक निमिष
चुक बनून राहतं,
दुरुस्त करु बघता
सारं आयुष्य सरतं.
Comments
Post a Comment