तुझ्या साच्यातून काढले
बेतले मुखवटे नवे,
माझा असा मी जराही
आता उरलोच नाही.
जे मलम वाटले मनाला
तेच बनले दु:ख जीवाचे,
उन्हानीही आग इतकी
कधी ओकली नाही.
वाट होती बिकट आणि
पाऊले नाजूकशी,
तेव्हा जरासे सावरताना
जीव माझा ओतला.
ती होती मी ही होतो
आणि वाट धुक्याने भारलेली,
सुटला हात हातातून आणी
साथ रस्ताने सोडली.
वाटले जुळतील पुन्हा
रस्ते वेगळे जरी,
घेतलेल्या शपथांना जरी
हजार फाटे फुटले.
Comments
Post a Comment