जे जे आहे ते तसे सांगणे गुन्हा नव्हे
चुकले असेल तर कान धरणे गुन्हा नव्हे.
चुकून असेल पडला पाय वादळवाटेवर
योग्य मार्ग पुन्हा निवडणे गुन्हा नव्हे.
हुकले वसंत आयुष्याचे प्रत्येक वेळी
कधीतरी अत्तर खरीदणे गुन्हा नव्हे.
आयुष्याचे मर्म समजण्या उशीर झाला
वेळेवरती घड्याळ बघणे गुन्हा नव्हे.
बदलतात ऋतू आजकाल उलटेसुलटे
सावरण्या पंख पसरणे गुन्हा नव्हे.
१/१/२०२२
Comments
Post a Comment