काही सुगंधी कोपरे आयुष्यभर तसेच जपायचे असतात.
प्रत्येकाला नाही जमत जूने कोपरे झाकून ठेवून वाऱ्याबरोबर वहात येणाऱ्या नव्या सुगंधापाठी दिशाहीन वाहवत जाणे, गळून पडलेल्या पिसासारखे.
या आठवणींचे कोपरे मनातील असो वा घरातील जपावेच लागतात स्वत:साठी,फक्त स्वत:च्या आनंदासाठीच.
कधीतरी त्या कोपऱ्यात डोकावायचे कोणाच्याही नकळत, कधी स्वत:च्याही नकळत आणि भरभरुन घ्यायचा सुगंध श्वासामध्ये, त्या आठवणीतल्या रातराणीसकट, सुगंधी करुन टाकायचं अस्तित्व स्वत:च, रात्रीतल्या एकाकी स्वप्नासारखे.
Comments
Post a Comment