पहाटे जाग आली, संपून रात गेली
एकट्या एकट्याने, सोडून रात गेली.
प्राजक्ता सारखी अलगद,ओघळून रात गेली
टांगलेली स्वप्ने उशाशी, खुडून रात गेली.
ती माझीच होती अन मी होतो तियेचा,
जोडणारु ती श्रृंखला, तोडून रात गेली.
लपवलेले डंख मनाचे,जे एकट्याचे होते
कुरवाळून त्यांना, दुखावून रात गेली.
झुंझुरक्या वेळी, पायी भरुन वारा
दिशा दिवसाची,दाखवून रात गेली.
Comments
Post a Comment