दु:खाच्या काफिल्यातून
सुखाचे सोयरे,
दाखविण्या पायवाट
आनंदाची.
काळ्याभोर ढगाला
सोनेरी किनार,
पोळल्या मनाला
थोडासा आधार.
सुख सुख म्हणजे
दुजे काही नाही,
आपुलकीची ओढ
नजरेतून
शब्द सारे द्वाड
शब्द सारे वेल्हाळ,
नजरेत मकरंद
नात्याचा.
आईची नजर
मायेचा पाझर,
तृप्तीचा हुंकार
हृदयात.
Comments
Post a Comment