अजूनही सारेच जग हे सुगंधाचे गीत गाती
कुस्करलेल्या पाकळ्यांना ना मिळे सद्गती.
उगवत्या सूर्याच्या साठी सारे जन अर्ध्य देती
विस्कटलेल्या रात्रीची व्यथा ना कोणी पुसती.
यशाच्या पायरी वरती हात सारे मिळवती
अपयशाच्या प्रयत्नांची का वाटे लाज ती.
सुखाचे सोबतीच येती बघ सुगीच्या शेवटी
घरट्यातले पक्षी सारे वाळवंटी उडून जाती.
असेच चाले जग आणि अशीच जगरहाटी
एकट्याने यावे आणि एकटेच असतो शेवटी.
Comments
Post a Comment