Skip to main content

वैद्यक विज्ञान- हिंदुस्थान आणि युरोप

१८ व्या शतकाची सुरवातीची दशक. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशा इंग्लीश लोकांच्या स्वत:च्या देशात काय परिस्थिती होती .
                   आधुनिक आरोग्य विज्ञान विकसित झाले नव्हते. ॲण्टिबॉयोटिक्सचे युग खुप दूरच होती. खुद्द इंग्लंडमध्ये ५०% मुलं जन्माला आल्यानंतर एकावर्षातच मृत्यूमुखी पडत होती. नामकरण विधींपेक्षा दफनविधींचे प्रमाण जास्त होते.
                   अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये मूल विविध रोगांबरोबरच कुपोषण,दुर्लक्ष , बाल संगोपनाविषयी अज्ञान यामुळे मृत्यूमुखी पडत होती.
                   प्रौढ आयुष्यातही साथीचे आजार, बाळंतपणात स्त्रीयांचा मृत्यू याचे प्रमाण भयानक होते.
                   त्याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात हातपाय रोवायला सुरवात केली. हिंदुस्थानातील एकही क्षेत्र असे नसेल ज्याच्या अभ्यास करुन इंग्रज किंवा युरोपियन त्यात प्राविण्य मिळवले नाहे. अगदी वेदांपासून, भारतीय भाषा,इतिहास, संस्कृती,लोककथा, लोक समजूती, सर्व विषयात ते तेवढे पारंगत झाले की त्यांनी केलेल्या/लिहीलेल्या अभ्यासाचा उल्लेख आजही या विषयांवरती अभ्यास करणारी लोकं आधार मानतात.
                   आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था त्या मानाने खुप चांगली होती, ती आयुर्वेदाच्या आणि वनौषधींचा वापर करणाऱ्या गावोगावच्या वैद्य मंडळीमुळे,प्रसुतीशास्त्र न शिकतासुद्धा त्या विषयात पारंगत असणाऱ्या सुईणींमुळे. बाल आणि शिशु संगोपनाबाबत घरोघरच्या जेष्ठांना असलेल्या ज्ञानामुळेच.
                   नंतर हे सर्व आपल्या हातून निसटू दिले आणि त्याच वेळी युरोप मात्र वैद्यकिय ज्ञानाच्याबाबतील विकसीत होत गेली.
                   आपल्या आयुर्वेदाचा, वनौषधींचा अभ्यासाने त्यांच्या आधुनिक वैद्यक विज्ञानाच्या विकासाचा पाया घातला असेल का ?
               

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४