शब्दांच्या ही पल्याड
आहे एक गाव
तेथे वेशीपाशी
आहे माझा देव.
घनगर्द काळोखाची
आरती मी ओवाळीते
मुक्यानीच भावनांचे
अर्ध्य त्याला देते.
जाणतो सर्व काही
नको शब्द वाया
नम्रतेचा लागे
त्याच्या माथी टिळा.
कशाला असावी
सहवासाची भुक
तोच तो समर्थ
माझ्या मध्ये आहे.
नको फुल पाने
नको धुप दाणी
नेत्रांची आरती
त्याला मिरवीते
अशी धन्य झाले
त्याचीया कृपेने
अवघीची झाले
त्याच्या कटाक्षाने.
Comments
Post a Comment