तुझे कृत्य,तुझे कर्म...
तुम्हीच सांगा कसे विसरावे..
तुमच्या एकेका शब्दा वरती
मन आमचे वेडे व्हावे.
तुझी नजर, तुझे विभ्रम
तुम्हीच सांगा कसे विसरावे...
तुझ्या एकेका श्वासा वरती
मन आमचे डोलावे.
तुझे शब्द,तुझे बोल
तुम्हीच सांगा कसे विसरावे...
तुझ्या एकेका उच्चाराने
मन आमचे भरुन यावे.
तुझी लज्जा, नजर झुकवणे
तुम्हीच सांगा कसे विसरावे...
तुमच्या एका दर्शनाने
मन आमचे रंगून जावे.
तुझी साथ,तुझी संगत
तुम्हीच सांगा कसे विसरावे..
तुमच्या नुसत्या आठवणींनी
मन आमचे तृप्त व्हावे.
Comments
Post a Comment