Skip to main content

Posts

Showing posts from 2021

गुन्हा नव्हे

जे जे आहे ते तसे सांगणे गुन्हा नव्हे चुकले असेल तर कान धरणे गुन्हा नव्हे. चुकून असेल पडला पाय वादळवाटेवर योग्य मार्ग पुन्हा निवडणे गुन्हा नव्हे. हुकले वसंत आयुष्याचे प्रत्येक वेळी कधीतरी अत्तर खरीदणे गुन्हा नव्हे. आयुष्याचे मर्म समजण्या उशीर झाला वेळेवरती घड्याळ बघणे गुन्हा नव्हे. बदलतात ऋतू आजकाल उलटेसुलटे सावरण्या पंख पसरणे गुन्हा नव्हे. १/१/२०२२

करावे लागतेच

आतून तुटून जाताना सजावं तर लागतचं, आतून उभारी याणेसाठी भजावं तर लागतचं. नसतंच सर्व कायम आपलं जपावं तर लागतचं, गेलं विरुन जरी काही स्मरावं तर लागतचं. आपलं आपलं म्हणण्याआधी जोखावं तर लागतंच, नाही आपलं समजून सुद्धा जगावं तर लागतंच. आयुष्यात ऋतू एकदाच येतो फुलावं तर लागतचं, नेलं लुटून वादळाने तरी तगावं तर लागतंच.

आईची नजर

दु:खाच्या काफिल्यातून सुखाचे सोयरे, दाखविण्या पायवाट आनंदाची. काळ्याभोर ढगाला सोनेरी किनार, पोळल्या मनाला थोडासा आधार. सुख सुख म्हणजे दुजे काही नाही, आपुलकीची ओढ नजरेतून शब्द सारे द्वाड शब्द सारे वेल्हाळ, नजरेत मकरंद नात्याचा. आईची नजर मायेचा पाझर, तृप्तीचा हुंकार हृदयात.

सुखाचे सोबती

अजूनही सारेच जग हे सुगंधाचे गीत गाती कुस्करलेल्या पाकळ्यांना ना मिळे सद्गती. उगवत्या सूर्याच्या साठी सारे जन अर्ध्य देती विस्कटलेल्या रात्रीची व्यथा ना कोणी पुसती. यशाच्या पायरी वरती हात सारे मिळवती अपयशाच्या प्रयत्नांची का वाटे लाज ती. सुखाचे सोबतीच येती बघ सुगीच्या शेवटी घरट्यातले पक्षी सारे वाळवंटी उडून जाती. असेच चाले जग आणि अशीच जगरहाटी एकट्याने यावे आणि एकटेच असतो शेवटी.

बघ मित्रा

कितीही रंग तुझ्या स्वप्नात असतील मित्रा पैशाच्या सावलीतच फुलतो इतिहास मित्रा नको धावूस सैरावैरा वाटेवर असा उगाच तू कुणाजवळ नाही तुझ्यासाठी वेळ मित्रा. संकल्प आणि सिद्धी जोडीने शोभती जरी त्यासाठी लागते धरावी प्रयत्नांची कास मित्रा. वर्ष बघ चालले शेवटच्या दिवसाकडे हळुहळु कॅलेंडर बदलणे एवढेच आपल्या हातात मित्रा.

सुख समाधान

समाधानाच्या झाडाखाली सुखाचे रोप रुजतं, त्या सुखाच्या झाडाला आनंदाचे फळ गोमटं. असे आगळं चक्र भाळी देवानं गोंदवलं, सुख समाधानानं  सारं विश्व व्यापलं.

देव माझा

शब्दांच्या ही पल्याड आहे एक गाव तेथे वेशीपाशी आहे माझा देव. घनगर्द काळोखाची आरती मी ओवाळीते मुक्यानीच भावनांचे अर्ध्य त्याला देते. जाणतो सर्व काही नको शब्द वाया नम्रतेचा लागे त्याच्या माथी टिळा. कशाला असावी सहवासाची भुक तोच तो समर्थ माझ्या मध्ये आहे. नको फुल पाने नको धुप दाणी नेत्रांची आरती त्याला मिरवीते अशी धन्य झाले त्याचीया कृपेने अवघीची झाले त्याच्या कटाक्षाने.

सोबत

वस्त्रातील एखादा धागा कमकुवत झाला,तुटला,विरत चालला ते वस्त्र नजरे समोर नकोसे होते, शक्य असेल तर तो धागा आणि त्या धाग्याला जोडले गेलेले बाजूचे धागे कापून वेगळे केले जातात, तसेच नाळ कापणे कुठे कठीण असते.                         दुष्काळ जीवघेणा असतोच पण दुष्काळाची चिन्ह दिसत असताना आपण आता काही करू शकत नाही ही हतबलता जास्त जीवघेणी असते, कुरतडत कुरतडत वाट पाहायला लावणारी. अटत चाललेल्या तलावातील माशांसारखीच.                         सजीवांची उत्क्रांती ठरलेल्या नियमांनुसार होते आणि ते अनंत काल चालणारे चक्र आहे. पण मनाची उत्क्रांती?                          थोडासा विचार, थोडासा विवेक आणि ॲटजेस्ट करण्याची वृत्ती वेळीच जोपासली तर मन उत्क्रांत होवू शकते. रुक्ष एकाकी वाळवंट टाळता येवू शकते, मृगजळाचा शोध घेत वणवण फिरणे नशीबी येत नाही.                        ...

आवर....

स्वत:भोवती काटेरी कुंपण घातले मी एकट्याला एकट्याने एकटे ठेवले मी नको आता अधिक उकळी भावनांना लोण्याला विस्तवापासून दूर राखले मी तिच्याच साठी ती वाट निवडली होती तिच्याच साठी वाटेवर जाणे सोडले मी. ही वेडी वळणे नवीन नाहीत इथे कुणा त्या रस्त्यावर पाऊल टाकणे सोडले मी. अजिंक्य आहेत म्हणे इच्छा मानवाच्या इच्छांना शरण जाणे कधीच सोडले मी.

घडले असे काही.....

तुझ्या साच्यातून काढले बेतले मुखवटे नवे, माझा असा मी जराही आता उरलोच नाही. जे मलम वाटले मनाला तेच बनले दु:ख जीवाचे, उन्हानीही आग इतकी कधी ओकली नाही. वाट होती बिकट आणि पाऊले नाजूकशी, तेव्हा जरासे सावरताना जीव माझा ओतला. ती होती मी ही होतो आणि वाट धुक्याने भारलेली, सुटला हात हातातून आणी साथ रस्ताने सोडली. वाटले जुळतील पुन्हा रस्ते वेगळे जरी, घेतलेल्या शपथांना जरी हजार फाटे फुटले.
एक शब्द,एक वाक्य ओठांआड अडतं, जिवन गाणं बनण्यासाठी आयुष्यभर झगडत राहतं. एक आवंढा, एक असू रेषे आड अडकतं, मोकळं होण्यासाठी ओलावा शोधत राहतं. एक व्यक्ती,एक स्वप्न हृदया बाहेर राहतं, हृदय मग स्वागतासाठी छाया धरुन बसतं. एक हुंदका,एक भावना ओठांआड गोठतो, पुढच्या साऱ्या आयुष्यात मनावरचे ओझं होते. एक क्षण,एक निमिष चुक बनून राहतं, दुरुस्त करु बघता सारं आयुष्य सरतं.

वैद्यक विज्ञान- हिंदुस्थान आणि युरोप

१८ व्या शतकाची सुरवातीची दशक. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशा इंग्लीश लोकांच्या स्वत:च्या देशात काय परिस्थिती होती .                    आधुनिक आरोग्य विज्ञान विकसित झाले नव्हते. ॲण्टिबॉयोटिक्सचे युग खुप दूरच होती. खुद्द इंग्लंडमध्ये ५०% मुलं जन्माला आल्यानंतर एकावर्षातच मृत्यूमुखी पडत होती. नामकरण विधींपेक्षा दफनविधींचे प्रमाण जास्त होते.                    अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये मूल विविध रोगांबरोबरच कुपोषण,दुर्लक्ष , बाल संगोपनाविषयी अज्ञान यामुळे मृत्यूमुखी पडत होती.                    प्रौढ आयुष्यातही साथीचे आजार, बाळंतपणात स्त्रीयांचा मृत्यू याचे प्रमाण भयानक होते.                    त्याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात हातपाय रोवायला सुरवात केली. हिंदुस्थानातील एकही क्षेत्र असे नसेल ज्याच्या अभ्यास करुन इंग्रज किंवा युरोपियन त्यात प्राविण्य मिळवले नाहे. अगदी वेदांपासून,...

वाट

कोणीतरी देईल आनंदाचे दान म्हणून हे मन व्याकुळले. आशेचे किरण डोळ्यांमध्ये जग अवघे पंचप्राण एकवटले. देई हाती हात सोबतीची साथ, चालू पायवाट एकसंगे. कल्लोळ मनात कल्लोळ स्वप्नात पाहे तीची वाट जिवभावे.

वंचना--त्याची व्यथा

लवकर उठावे,गोठवणाऱ्या थंडीतही थंडगार पाण्यात बुडबुड कावळ्यासारखी बुडी मारुन अंघोळ उरकावी, आरशात बघून आपले चमकदार केस नीट विंचरावे आणि तयार व्हावे तिच्याचसाठी.           शतनुशतके,हजारो वर्ष हेच ते आणि हेच ते. तिच्यासाठी चंद्र आणि तारे, तिच्यासाठी सारे ऋतूंचे पसारे.           तिच्यासाठी पुन्हा पुन्हा नव्याने धुक्याची दुलई विणावी, तिच्या सर्वांगाची तलखी थांवण्यासाठी शॉवर बसवून द्यावा.           तिला नटण्यामुरडण्याची भारी आवड म्हणून रंगीबेरंगी फुले उमलावीत, तिच्या शृंगारासाठी चंद्रकिरणांचे शितल क्रिम बनवून द्यावे. अमावास्येचे काजळ घोटून द्यावे.           ती चोवीस तास ऑनलाईन असते त्यामुळे जास्तीतजास्त वेळ ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करावा, अगदी दुसरीकडे जावे लागले तर आपल्या मित्राची चंद्रकांताची मदत घ्यावी. अगदी फेसबुकवरच्या प्रेमवीरासारखे.           निव्वळ आपण आखलेल्या राजमार्गावरती कोणी धुमकेतूसारखे उगवून त्या राजमार्गावर शॉर्टकटने वहिवाट लावू नये म्हणून.    ...

व्यसनाधीनता

कुठल्यातरी नप्रेमकथेत वाचले "प्रेमाचे ही व्यसन असते".               तेही कधीही न सुटणारे व्यसन.              दारु सारखंच, शेवटपर्यंत सोबत .              लहानपणी फक्त दिसणं आवडत, सुरवातीला दारुची बाटली आवडावी तशीच, नाविन्याची ओढ, बाह्य सौंदर्यातच गुंतून पडण्या इतपतच.              काही वर्षांनी सोनसळी रंग,तेज मनाला आकर्षित करते.              नंतरचा काळ येतो तो सुबक आकार ओढ लावण्याचा, तारुण्याची सुरवात. मी एकाकडे त्याकाळातल्या वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या आणि फोटो जमवलेले बघितले आहेत.              मग येत चव, चव आवडणे ही गुंतत जाण्याची सुरवात दोन्ही प्रकारच्या व्यसनात.              मग येते ती त्यापासून मिळणारी उत्तेजना ,फायदे बघण्याची वेळ, माणूस तरुणपणाच्या मध्यावर असतो. स्थिरस्थावर होण्यासाठी योग्य ते शोधत असतो.         ...

संभ्रमात हरवलेला रस्ता

 चालावे की उभे रहावे हा एकच सवाल आहे.  ह्या संभ्रमाच्या वाटेवर तापलेल्या हवेवर हेलकावत तुटलेले पान होऊन भिरभिरावे निःसंगपणे की टाकून द्यावे अंग तप्त भुमीवर ? आणि करावा शेवट अस्तित्वाचा मनातल्या...? माझा तुझा ह्याचा अन त्याचाही. एकाकीपणाचे हलाहल भरुन घ्यावे उरामध्ये… की नंतर असणाऱ्या जिवंतपणाला नसावा स्पर्श अमृताचा कधीही.. पण मग.. पण मग त्या त्या अस्तित्वाला ही ग्रहण लागलं तर….? तर…तर… इथेच मेख आहे.नव्या लोकांच्या अनोळखी जंगालात प्रवेश करण्याचा, धीर होत नाही म्हणुन आम्ही जपत रहतो जुने आपलेपण.. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने उपेक्षांचे प्रहार… अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या मी पणाचा अंत.. आणि अखेर शरण जातो खालच्या मानेन भुतकाळाच्या दाराशी. विधात्या.. तु इतका कठोर का झालास? एका बाजुला आम्ही ज्यांना प्रेम दिले ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला प्रेम दिले तो तु हीआम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या आठवणींचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा… आम्ही कोणाच्या दारावर डोक आदळायच? कोणाच्या दारा ? कोणाच्या ? कोणाच्या??? मामा वरेरकारांसारख्या प्रख्यात नाटककार,जगन्मित्र,कोट...

सुगंधी कोपरे

          काही सुगंधी कोपरे आयुष्यभर तसेच जपायचे असतात.            प्रत्येकाला नाही जमत जूने कोपरे झाकून ठेवून वाऱ्याबरोबर वहात येणाऱ्या नव्या सुगंधापाठी दिशाहीन वाहवत जाणे, गळून पडलेल्या पिसासारखे.           या आठवणींचे कोपरे मनातील असो वा घरातील जपावेच लागतात स्वत:साठी,फक्त स्वत:च्या आनंदासाठीच.           कधीतरी त्या कोपऱ्यात डोकावायचे कोणाच्याही नकळत, कधी स्वत:च्याही नकळत आणि भरभरुन घ्यायचा सुगंध श्वासामध्ये, त्या आठवणीतल्या रातराणीसकट, सुगंधी करुन टाकायचं अस्तित्व स्वत:च, रात्रीतल्या एकाकी स्वप्नासारखे.

जाता जाता

आयुष्याचे मर्म समजले जाता जाता व्यथांनीही साद घातली जाता जाता. किती रंग बदलले देवांनीही धरणीवरती माणसांनी सत्त्व जपले जाता जाता. भ्रमाचे डोंगर रचले स्वत: भोवती सत्याची ओळख विसरले जाता जाता. मार्ग किती ते पक्षांचे ही दाण्यासाठी घरट्याकडे अचूक वळती जाता जाता. जगण्यासाठी सर्व लुटले जगताने या श्वासांचीही किंमत केली जाता जाता ओलावा अजून टिकून आहे धरणीवरती किती उन्हाळे असेच सरले जाता जाता. आयुष्याचे दान मिळाले फुकट सारे उधळून ते रिक्त झालो जाता जाता. डोईवरी आता उन्हाळा कायमचा तो छत्र धरणारे हात सुटले जाता जाता.

रात गेली

पहाटे जाग आली, संपून रात गेली एकट्या एकट्याने, सोडून रात गेली. प्राजक्ता सारखी अलगद,ओघळून रात गेली टांगलेली स्वप्ने उशाशी, खुडून रात गेली. ती माझीच होती अन मी होतो तियेचा, जोडणारु ती श्रृंखला, तोडून रात गेली. लपवलेले डंख मनाचे,जे एकट्याचे होते कुरवाळून त्यांना, दुखावून रात गेली. झुंझुरक्या वेळी, पायी भरुन वारा दिशा दिवसाची,दाखवून रात गेली.

कौतुक

तुझे कृत्य,तुझे कर्म... तुम्हीच सांगा कसे विसरावे.. तुमच्या एकेका शब्दा वरती मन आमचे वेडे व्हावे. तुझी नजर, तुझे विभ्रम तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुझ्या एकेका श्वासा वरती मन आमचे डोलावे. तुझे शब्द,तुझे बोल तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुझ्या एकेका उच्चाराने मन आमचे भरुन यावे. तुझी लज्जा, नजर झुकवणे तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुमच्या एका दर्शनाने मन आमचे रंगून जावे. तुझी साथ,तुझी संगत तुम्हीच सांगा कसे विसरावे.. तुमच्या नुसत्या आठवणींनी मन आमचे तृप्त व्हावे.

ऐ गझल

ऐ गझल,तू कभी तो मेरे शब्दों मे ढल जा आसूंओं को मेरे भी कभी तेरा कफन मिले।

आशा

आसवांना माझ्या अजूनही थोडीशी खंत आहे, पुर्णपणे विरक्त होण्या मी कुठे संत आहे. भोगले जे दिधले दैवाने ओंजळीत माझ्या दैवावर स्वार होण्या मी कुठे महंत आहे. मिळवले हात नेहमी जे भेटले तयांशी आयुष्य अजूनही माझे, असे कसे संथ आहे. केला होता करार त्याने सोबतीच्या माझ्या आशा अजूनही अंतरी थोडीशी जिवंत आहे. वाट पाहण्यासाठी अजूनही थोडी उसंत आहे तरीही कुठेतरी जिवनाला ठरलेला अंत आहे.

नाते अनामिक

या चंद्राचे त्या किरणाशी असे अनामिक नाते, किरणाच्या नुसत्या स्पर्शाने याचे प्रकाशित होणे. युगानुयुगे चालले हे किरण आणी धरेचे नाते, तिच्याच मुळे फुलणे  तिच्याच पायी स्तब्ध होणे. चंद्राचे एकाकीपण  कोळाखाने वेढलेले, किरणांच्या गोंजारण्याने कलेकलेने वाढत जाणे. आकाश आणि धरतीचे नाते न दिसता ही मानलेले, तसे तुझे नी माझे प्राक्तन एकमेकांशी जोडले जाणे.

येता तुझ्या कुशीत

शब्द आणि चित्र एकाच दिवशी मिळावे यासारखा आनंद नाही तु फुल अमृताचे,मी निर्माल्य सुकृताचे पुन्हा सुगंध मिळाला,येता तुझ्या कुशीत. तू पुत्र अमृताचा, मी मानवी विकार नवजन्म लाभला तो,येता तुझ्या कुशीत. तु शिखर पर्वताचे, मी वाळवंटी विखार स्वर्गभुमी झालो, येता तुझ्या कुशीत. तू ज्ञान देवाघरचे, मी अज्ञान मानवाचे ज्ञानरुप झालो,येता तुझ्या कुशीत.

अव्यक्त

नाते तुझे नी माझे अमृता सम मधुर, शब्दाविना उलगडे मनामनात भाव. वाटे लुटून यावे सारे तुझ्यावरी ते तुझ्या समीप येवून एकरुप व्हावे. विरहाची वेदना ही होते असह्य आता, आभाळ होवून आता तुजला मिठीत घ्यावे. हे शब्दही निमाले भाव अव्यक्त राहे, तुझ्याविनाच आता अंता समिप जावे.

अमृता

अमृता सम मधुर होवूनी सलील येते, जे भेटते त्याच्याशी एकरुप ते होते. ते रुप अमृताचे जणू फुलपाखरी डौल स्वर्गातले फुल जणू ते धरतीवर उमलले.

अमर विषवल्ली

अमरशेख,कधीच नष्ट न होणारी विषवल्ली. हिच्यापासून आपल्या बागेची काळजी घ्यायची असेल तर आपल्या व आपल्या आजूबाजूच्या बागेत ती फोफावत नाही यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.         पण आपण काय करतो,         आपल्या बागेतील नष्ट करताना शेजाऱ्याच्या बागेत टाकण्याच्या क्षणिक असूरी आनंद मिळवतो.         काहीनाही असे असूर माझ्या लिस्टमध्येही आहेत एवढंच.

नकोच आता.....

नकोच आता प्रेम अनावर नकोच आता वेडी राधा, पैलतीरावर वाट पाहते तुकोबाची निर्मल गाथा. नकोच आता ओढ असोशी नकोच आता स्वप्न कोवळे पैलतीरावर वाट पाहते दासांचे वैराग्य चिंतन. नकोच आता खेळ आगळा नकोच आता इमले रचणे, पैलतीरावर वाट पाहते नाथांचे ते स्निग्ध स्पंदन. नकोच आता भाव अनामिक नकोच आता रेशीमगाठी, पैलतीरावर वाट पाहते मुक्ताईचे मुक्त होणे. नकोच आता वाट पाहणे नकोच आता गुंतत जाणे, पैलतीरावर वाट पाहते ज्ञानेशाचे निघून जाणे.

दिपावली

न मागताच इथे, गवसले सर्व काही न धावताचे कोठे, उजळल्या दिशा दाही कशाला करावी आर्जवे, किती कुणाची दिवा दाखवीत जेव्हा,आपुलकी देई ग्वाही. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

धर्म आणि शहाणपण

विषारी सापाला ठेचून टाकणे हा धर्म असला तरी त्यासाठी आंधळेपणाने भुई धोपटुन अमृतासम असणाऱ्या औषधी मुळ्या नष्ट करणे हा शहाणपणा खचितच नाही.

आपुलकी

आपुलकीने नाराज व्हावे आणि आपुलकी  या शब्दानेच नाराज होवून निघून जावे आयुष्यातून,  तेव्हा लक्षात येते उसन्या हिरवळीला नाराजीचा अधिकार नाही तीने टिपून घ्यायलाच हवा ओलावा मिळेल तेवढा स्वत:चा शेवट लांबवण्यासाठी.

गुलाबी

वसुंधरेला गुलाबी रंगत रंगलेली बघून सूरजकुमार धुक्याच्या दुलई आड लपून बसलेला. कोणतरी त्याला समजावले, धरा जे ऋतू पांघरुन घेते, जे सण,उत्सव,उपवास करते ते फक्त आपल्या माणसाच्या म्हणजे तुझ्याच समृद्धी, आनंद आणि उत्कर्षासाठीच. तुझ्या कलाकलाने हे सर्व चाललले असते. स्वत: आनंद साजरा करताना ती सर्वांनाच आनंद वाटत असते. अशा वेळी... असे लाजणे बरे नव्हे चेहरा लपवणे बरे नव्हे, असता गुलाब फुललेले सुगंध टाळणे बरे. तेव्हा आला एकदाचा बाहेर. त्याला तसेच तुम्हालाही गुलाबाच्या सुगंधाचा आनंद घ्यायला मिळो. याच गुलाबी दिवसाच्या शुभेच्छा.

करडा रंग

करड्या रंगाच्या छटांमधून माणुसकी दिसते, कोणी पुर्ण काळा किंवा पुर्ण गोरा असे कधीच नसते.

पिवळा रंग

१) पिवळा गोजिरा रंग लेवूनी सजली दुर्गेची रुपे साजिरी, सुर्याचे तप्त किरण ओढूनी नजरेमधूनी उजळे समई. शांततेची मुर्त जणू ती साऱ्या जगताची माऊली नवरात्रीतील नऊ दिसांची चराचरासाठी ती साऊली. २) पिवळीच ती पाकोळी ती धरतीवरती अवतरली, लेवून सोनसळी किरणे फुलपाखरे भिरभिरली.

नवीन सुभाषित

संपत्ती, स्त्री आणि अन्न या तीन गोष्टींना परक्यांच्या नजरांपासून दूर ठेवा असे एक जूने सुभाषित आहे. पुरातन कालबाह्य गोष्ट ठरलीय ती आता. पण तुमच्या विचारांना लोकांच्या नजरेपासून दूर ठेवा, तुमचे शत्रू तुमचे विचार संपवण्याचा प्रयत्न करतील. तुमचे मित्र मात्र तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करुन तुम्हाला नामोहरम करु पाहतील.

भस्मासूर

असे म्हणतात की, "रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता".      हे तंतोतंत खरे वाटावे अशी परिस्थिती आजूबाजूला दिसतेय, गेल्या काही वर्षात पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जचे प्रमाण काही ग्रॅम्स पासून काही हजार किलोपर्यंत पोहोचले आहे.      नेहमीसारखे तरुणांना व्यसनाधीन करण्याचे पाकिस्तानचे षडयंत्र म्हणून दुसरीकडे बोट दाखवून हे थांबणार नाही आहे.       पैसेवाल्यांची पोरं टाईमपास आणि बापकमाईचा माज म्हणून बाई,बाटली, ड्रग्ज याच्याकडे बघतो.        गरीब लोकं अभावग्रस्तीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी या व्यसनांना जवळ करतो.        आणि मध्यमवर्गीय हा मधोमध लोंबकाळणारा वर्ग वैफल्यग्रस्त होतोय, तो या गोष्टींकडे थ्रिल म्हणून बघतोय. मध्यमवर्गीय तरुणांमध्ये हुक्काची वाढणारी फॅशन हेच दर्शवतेय. मी व्यसनाच्या आहारी जाणारचं नाही हा खोटा अहंकार त्यांना याचा आहारी लोटतोय. यांच्या पालकांना वरच्या वर्गात जाण्याची लागलेली ओढ यांना मुलांपासून दूर ठेवतेय.       रोम जळतेय आणि सरतेशेवटी याची सर्वात जास्त झळ लागणार आहे तो समाज कोण...

म्हणू नये.....

वठले झाड त्याला  वाढणे म्हणू नये, सुटले हात त्याला साथ म्हणू नये. कुंठला अभ्यास त्याला ज्ञान म्हणू नये, सुटला विवेक त्याला विचार म्हणू नये. तुटला ओलावा त्याला माया म्हणू नये, ढळला तोल त्याला आचार म्हणू नये. आपुलकीची साथ त्याला आभास म्हणू नये, रुक्षतेचा भास त्याला खास म्हणू नये. सुटले प्रयत्न त्याला प्रगती म्हणू नये. तुटला विश्वास त्याला भक्ती म्हणू नये.
जूने दु:ख उगाळणे बरे नव्हे तेच ते रडगाणे गाणे बरे नव्हे, किती रंग आहेत जीवनात या नव्यात जूने रंग मिसळणे बरे नव्हे

सहजच.....

सहजच लिहीली कविता सहजच शब्द आले ओठी सहजच कवितेतून उमटले मन भावनेचे मोती. सहजच भरावे आभाळ सहजच व्हावी कातरवेळ सहजच ओठामधून उमलावी शुभ्र बगळ्यांची माळ. सहजच यावी तान सहजच उठावी लकेर सहजच अंतरंगात जमावी आप्त स्वकीयांची मैफल. सहजच फुल उमलावे सहजच बाळ हसावे सहजच दारी यावे सुख समाधानाचे पाऊल. सहजच सुख वेचावे सहजच समाधान वाटावे सहजच येता जाता द्यावे थोडे आनंदाचे देणे.
विशाखा अभ्यंकर आज्जी काही माणसं असतात कोमल,नाजूक, सुगंधी, सुंदर, सर्वांना हवीहवीशी वाटणारी - प्राजक्ता सारखी. प्राजक्ताला देववृक्ष म्हणतात तशीच.   देव बघितलेला नसला तरी काही माणसं देवाचे गुण घेवून येतात. त्यांना जपावे लागते हळूवारपणे, न दुखावता आपल्या ओंजळीत, आठवणींच्या कप्प्यात   असाच एक देवतरु माझ्या बागेतही आहे. लांब राहूनही लयलूट करणारे आनंदाची,आशिर्वादाची.  सहवासातील प्रत्येकावर माणिकमोत्यांचा लयलूट करणारी, फक्त त्यांच्या सावलीशी एकरुप होता आले पाहीजे.

सहजच

सहजच लिहीली कविता सहजच शब्द आले ओठी सहजच कवितेतून उमटले मन भावनेचे मोती. सहजच भरावे आभाळ सहजच व्हावी कातरवेळ सहजच ओठामधून उमलावी शुभ्र बगळ्यांची माळ. सहजच यावी तान सहजच उठावी लकेर सहजच अंतरंगात जमावी आप्तांची स्वकीयांची मैफल. सहजच फुल उमलावे सहजच बाळ हसावे सहजच दारी यावे सुख समाधानाचे पाऊल. सहजच सुख वेचावे सहजच समाधान वाटावे सहजच येता जाता द्यावे थोडे आनंदाचे देणे.

प्रेमावरची पुस्तके

"प्रेम हे वाचण्याची गोष्ट नाही तर करण्याची गोष्ट आहे" असे व.पु.काळे किंवा अवि.बापट दोघांपैकी एकाने म्हटले आहे.  आणि मुख्य म्हणजे दोघांनी केले नाही म्हटलेच आहे.

पहाटेची जाग

गजर लावतो,जाग येते पण तेव्हा बाहेरचा उजेड अजून पहाट झाली नाही असे ओरडून सांगत असतो,मन द्विधा होते शेवटी घड्याळापेक्षा हजारो वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुर्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि डोक्यावरुन परत पांघरूण ओढून घेतो.

आठवणी - २

आज गौरी गणपती घरी जाण्यासाठी निघतील,त्यापूर्वी सगळ्यांनासाठी प्रसाद घेवून आलोय. सुकामेवा आहे म्हणजे कोणालाही व्यर्ज असण्याचे कारण नाही.        कडू किंवा खवट निघणार नाही याची १००% गॅरेंटी कारण "पुराना है यह !" पन्नास वर्षांपेक्षा जास्त.        गावातल्या मारुती मंदिरात दासनवमी उत्सवाच्यासाठी अनेक वर्ष नाशिकचे काळेबुवा किर्तनासाठी येत त्यांच्याकडून आजोबांनी हा सुकामेवा घेतला होता. आता आजोबाही नाहीत,काळेबुवा ही नाहीत पण ही आठवण, हि मातीची कला अजूनही जशीच्या तशी शिल्लक राहीली आहे.

आठवणी - १

"आठवणी या कठीण कवचाच्या फळांसारख्या असतात, उमेदीच्या काळात त्यांचा मधूर स्वाद घेता येतो,नंतर मात्र कातर खिन्नपणाच चाखायला मिळतो".                                 ----कॉपीकॅट काळे.            या तर आजोबांच्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या,ज्या काळात फळांचा सुकाळ एवढा मोठ्या प्रमाणात झाला नव्हता, विज्ञानही फळांना ऋतूंच्या बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्त करण्याएवढे पुढारलेले नव्हते. आणि हवी त्याच दिवशी फळांंना पिकायला लावणारी केमिकल्स जन्माला यायची होती.           त्या पुरातन काळी बाप्पाच्या साध्या डेकोरेशनसाठी ही फळं समोर मांडण्याची बाळबोध रीत होती.

गजानन

निसर्ग बरसला सुखाचा पाऊस, आनंदाचा कंद घरी आला. भक्तीचा उत्सव आनंदले रोम गणपतीचा सण आला आला. सुखकर्ता आला विघ्नहर्ता आला, आयुष्याचा कर्ता घरी आला. वर्षभर ज्याची पाहतो मी वाट, तो दु:खहर्ता घरी आला. फुलला पारिजात उंचबळे सुवास, सुगंधाचा दाता घरी आला. विद्येचा ईश्वर ज्ञानाचा दाता बुद्धीचा विधाता घरी आला.

अधांतरी.....

निरर्थकाची डायरी अधांतरी....            काल आदित्यची बातमी ऐकली, तात्या अभ्यंकरांनी कधीकाळी आम्हाला एका ग्रुपवर ॲड केलं तेव्हापासूनची ओळख. त्याची वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीसं, त्याची जर्लनालिस्ट होण्याची आणि त्यासाठी डिप्लोमा करण्याची धडपड. चिपळूणमध्ये सुरु केलेलं हॉटेल. उभं रहाण्यासाठी सुरु असलेली झुंज. काल नियतीने करार मोडला आणि ही झुंज एकाएकी एकांगी संपली.            काल समजलं आणि मन सुन्न झालं. पुनर्जन्म असेल तर तो अपुरी स्वप्न डोळ्यात घेवून पुन्हा येईलच. पण काल पहिला विचार आला तो त्याच्या होणाऱ्या बायकोचा,तीची गेली कित्येक महिने बघितलेली स्वप्न डोळ्यातच गोठली,त्या स्वप्नांचा आधारच खचून गेला.            असंच असतं आपण बघितलेली स्वप्न ही आपली स्वत:ची असली तरी आजूबाजूच्या लोकांच्या भक्कम आधारावरती अवलंबून असतात. मैत्री, प्रेम, जीवन, स्वप्न, स्वातंत्र्य भक्कम आधारावर असेल तरच अर्थपुर्ण.            एकाकी अधांतरी लटकणाऱ्या गोष्टी कितीही सत्य,शिव आणि सुंदर असल्यातरी निरर...

निसर्ग मानव अभिन्नत्व

झाडाला नव्याने येणारा धुमारा योग्य वेळी खुडून टाकला तर ते झाडासाठी पोषक ठरते पण योग्य संधी साधून परत परत धुमारा खुडून टाकला तर ते झाड मरुन जाते.            वसंत येतो तो सगळ्यांसाठीच पण नव्याने गुढ्या उभारुन त्याचे स्वागत करायचे कि नाही हे प्रत्येकाच्या हातात असते.             झाडांकडे जो जो बघवे तर त्यातही माणूस दिसू लागतो. काही माणसं असतात पिंपळाच्या झाडासारखी एकटीच सळसळत राहणारी. काही असतात कोकणच्या राजा सारखी ऋतू बदलला की आनंदाने डोलत झिंमा खेळणारी. काही वटवृक्षासारखी स्थिर अविचल,खंबिरपणे पाय रोवून उभी राहणारी, उन,वारा, पाऊस स्वत:ची छाया वाटत राहणारी. काही सावरी सारखी सगळे वाटून टाकून नव्याच्या स्वागताला नव्याने उभी राहणारी.             काही स्वत:च स्वतः चे बोन्साय करुन घेतात, आपल्या मुळांना लगाम घालून,हातांना पसरण्यासपासून रोखत.             तशी माणसंही चालती बोलती झाडंच, फक्त देवाने त्यांना एक वरदान दिले आहे, आपण कोण बनायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य, कल्पवृक्ष बनाय...

फितूर

सावली पकडून ठेवण्याचा खुप प्रयत्न केला पण झाडाची पानंच फितूर होती किरणांना.

मैत्र

शब्दांचेच मैत्र शब्दांचीच माया, अपुर्वाची छाया माथ्यावर. शब्दाचीच साथ शब्दांची सोबत, आयुष्याचे गणगोत शब्दच रे. शब्द माझी माय आयुष्याची साय, निर्गुणाची साथ निशब्द.

देवाची सोबत

एखादी छोटीशी चुक कायम सलत राहते,अशा वेळी वाटतं देव सोबत असावा,ती चुक दुरुस्त करण्याची संधी देण्यासाठी, फक्त एक संधी,तेवढाच मार्ग त्याने दाखवावा.

भावना आणि श्रद्धा

कसे सांगू "काळजी घ्या" अनेकांना ते मुर्खपणाचे वाटते.         कसे सांगू "सर्व ठिक होईल, देव पाठीशी आहे" नास्तिकांना हे अडणीपणाचे वाटते. आपण शब्दांनाकडे चौकसपणे बघताबघता त्यामागच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. इंटरनेटमुळे जग जवळ आल्यापासून एवढ्या अनपेक्षित घटना, संकटे बघायला मिळतायत की आपण भावनाहीन बनत चाललोय.        हेच सर्व इंग्लिशमध्ये म्हटलं की मात्र आपल्याला गोड वाटते.         पण जिथे आपण स्वत: मदतीला जावू शकत नाही तिथे या भावनाच लाखमोलाच्या असतात. देव संकटात मदतीला येईल हा विश्वास पुढे जायला, जोखिम पत्करायला आधार देतात, " कोणतीही जोखिम न पत्करणे हीच मोठी जोखिम आहे" असे पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर बर्नाड यांनी म्हटले आहे. कोणीतरी अशा विश्वासाने पुढे जात असेल ते बघून एखाद्या माणसातली माणूसकी जागी होवून तो मदतीला येतो, तेव्हा आपण म्हणतो," अगदी देवासारखा धावून आला"         भावना कुचकामी नसतात, एखादी श्रद्धा जर मानसिक आधार देत असेल तर तिला टाकाऊ का समजावे ? आपली संस्कृती याच एकमेकांविषयी वाटणार...

बातमीचा प्रवास

बातमीचा प्रवास       जवळपास महिन्यांपूर्वी एबीपी माझावर महाड-भोर रस्त्यावर घाटात बिबट्या दिसल्याची बातमी आणि व्हिडीओ दाखवला.        आमच्या इथे येताना तो व्हिडीओ अलिबाग बाहेरच्या कार्लेखिंडीत बिबट्या दिसला अशी झाली.           पुढे आमच्या गावातील व्हॉट्सअपवर येताना ती बातमी गावाबाहेरच्या डोंगरावर बिबट्या दिसला अशी झाली.            नशीब गावातील आमच्या भागात डोंगर,टेकडीच सोडा, साधी राई सुद्धा नाही नाहीतर त्या राईचा पर्वत करुन त्या बिबट्याला त्या पर्वतावर उभा केला असता.            प्रत्येक गोष्ट किहीतरी शिकवत असते, प्रत्येक क्षण आपला गुरु असतो, बातमी फॉरवर्ड करताना जबाबदारीने करावी एवढीच शिकवण आपण शिकलो तरी गुरुपौर्णिमा साजरी झाली समजायचे.

सल्ला

आपला कल काय कर हे सांगण्यापेक्षा काय करु नको हे सांगण्याकडे असतो. खरा मार्गदर्शक तोच असतो जो कोणाता मार्ग निवडावा यासाठी मार्गदर्शन करतो.           इथे फेसबुकवरही लोकांच्या टिंगलटवाळीच्या पोस्टवरुन,कॉमेंट्सवरुन काय करु नये याचेच क्लासेस चालवलेले दिसतात.           कोणाची काळजी करण्याची गरज नाही, प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतच असतो. हे इथेच समजते.             इथे कोणाशी नाती जोडू नयेत हे ज्ञानही इथेच दिले जाते.             मला आठवतेय पाच-सात वर्षांपूर्वी एका ८२ वर्षांच्या गृहस्थांना कॉमेंटमध्ये काका म्हणालो तेव्हा ते ताडकन म्हणले," नाते जोडण्याची गरज नाही, आपण इथे फ्रेंड आहोत तेवढेच बास आहे".              मग मी विचारले, "म्हादू, रत्नागिरीत कुठे राहतोस रे?" तर तो दोस्त रागवून अनफ्रेंड करुन गेला, माझं काही चुकला का ?             पण एक धडा मिळाला पहिल्याच ओळखीत नातं जोडू नये आणि वय बघून तर कधीच नको.

विठ्ठल

कधी वाटते नसते काही दिवस-रात्र असले काही, विठ्ठलाच्या पाया पाशी युगे सरती साही. विटे वरती उभा तो स्थिर बुद्धीचा दाता ग, तुझे माझे विसरुन सारे हाक मारुया आता ग. आपत्तीच्या वाटा सरुन सुख समाधान येवू दे, चालता चालता वाटेवरती विठ्ठल निधान भेटू दे.

विठ्ठल

कधीतरी देवा तुझ्या पायाशी यायचयं, चंद्रभागेमध्ये नाही तुझ्या प्रेम रसात नहायचयं. तुझ्यामाझ्यातला देवा भेद सारा सरु दे, तुझ्या सावलीत सारे आयुष्य माझे सरु दे. नाही अभंग,  नाही गाथेच्या ओळी, तुझ्या श्वासाच्या तालावर सारे आयुष्य झुलू दे. सारे संशय सारे किंतू सरु दे देवा माझ्या श्वासामध्ये फक्त तुझे नाव उरु दे.

आशा

मुळावर घाव घालून अस्तित्व मुळीच सरत नाही, नवीन कोंब अवतरतोच स्वप्न कधीच मरत नाही.

शेवटचा अभंग

माझीया चुकांचे माझ्या हाती खापर त्याचे चटके फार देवू नको रे. तू घनू अमृताचा औषधी जीवांचा तुझा रेशीमहात फिरु दे रे. नको आता देवू विरहाचे दु:ख तुझ्या कुशीमध्ये सामाव रे. एकाकी हा जीव एकाकी तू देव दोघांचे अद्वैत घडो दे रे.

रंग दु:खाचे

जूने दु:ख उगाळणे बरे नव्हे तेच ते रडगाणे गाणे बरे नव्हे, किती रंग आहेत जीवनात या नव्यात जूने रंग मिसळणे बरे नव्हे.

स्वातंत्र्य-तिचे माझे

ए ऐक ना !       तुला आधीच सांगितले होते,तुझा पराजय अटळ आहे.        तुला इथे स्वातंत्र्य असते ते त्यांनी ठरवून दिलेल्या परिघातच. कधीतरी हा लहान मोठा होतो पण परिघातच भरारी घेणं हे अटळ प्राक्तन आहे तुझे.         कधी हा परिघ उंबऱ्याच्या आत असतो तर कधी थोडाफार मोठा पण असीम,अथांग कधीच नसतो.          तुझ्या जोडीदाराच्या स्वप्नाची झेप जेवढी उत्तुंग असले तेवढेच जास्त आकाश तुझ्यासाठी खुले असेल,त्याच्या उंच भरारीत त्याला सावरायला, सांभाळायला कोणीतरी सोबत हवे म्हणूनच.           संस्कारांच्या पाऊलखुणांच्या आतच शोधावे लागेल तुला आत्मसन्मान, त्याच्या बाहेर गेलीस, अगदी शब्दांनी सुद्धा तर पावलोपावली तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल.             असे निसरडे रस्ते या आधी अनेकांनी पायी तुडवले तेव्हाच तेथे वहिवाट चालू झाली जर कोणीच या रस्त्यांवरुन चालले नाही तर अविचारांचे शेवाळ त्यांना आणखीन निसरडा करणार,तू ठामपणे चालत राहिलीस तर उद्या अनेकजणी तुला समजून घेणाऱ्या विश्वासाने च...

प्रतिक्षा

सहवासाची भूक, सोबतीने मिटवू या कल्पनेच्या तीरावरुन हे न्याहाळणे कशाला! आषाढही बरसून गेला, नभही निरभ्र झाले तुझ्या माझ्या मनातल्या ऋतूंचा संहार कशाला! उमलू दे बाग सारी, सुगंधाने दिशा भरू दे. एक थेंब अत्ताराची आणखी प्रतिक्षा कशाला! अस्तित्वाची ही लढाई,शब्दांनीच लढूया भावनांच्या खाली निवृत्तीचे वादळ कशाला!

निरर्थकाची डायरी ८

निरर्थकाची डायरी...... माणसं कसली कसली ओझी डोक्यावर घेवून जगत असतात.        काही स्वत:च्या आनंदासाठी,वेळ आनंदात जाण्यासाठी टिव्ही बघतात आणि सिरियलमधेच गुंतून पडतात. दिवसभर त्या सिरियल्सची वाट बघणं, त्या गोष्टींचाच विचार करत बसणे.         दुसऱ्या प्रकारची लोक, त्यांना या सिरियल्स अजिबात आवडत नाहीत, त्या सिरियल्सचा द्वेष करतात, त्या चालू असताना टिव्हीसमोर बसणे ही त्यांना जमत नाही.          खरे म्हणजे या सिरियल बघणे म्हणजे निव्वळ हमाली, खोट्या गोष्टीतील सुख-दु:खाच्या भावनांचे ओझे स्वत:च्या माथी घेणे.          कोणताही हमाल डोक्यावरचे ओझे विनाकारण डोक्यावर वागवत नाही,वेळ आली की डोक्यावरुन उतरवून टाकतो,मोबदला खिशात सारतो, पुढे सरतो.          तसेच त्या सिरियलमुळे झालेला आनंद किंवा मानसिक त्रास ही त्या ओझ्याची बिदागी समजून ते ओझे माथ्यावरुन उतरवून टाकले पाहीजे.          प्रत्येकवेळी मनपसंद मोबदला मिळेल किंवा नाही,तरी योग्य क्षणी ते ओझे उतरवणेच सर्वोत्तम मा...

ती

तू तू - मी मी खुप झाले. आता.... तिच्याबद्दल बोलू काही. --------------------------------- ती गाण्यात होती ती गळ्यात होती हृदयाला छेडणा-या  तारेतही तीच होती. ती शब्दात होती ती कडव्यात होती शब्दाशब्दात लपलेल्या भावातही तीच होती. ती फुलात होती आसमंतात होती, फुलाफुलात गोठलेल्या गंधकोषात तीच होती. ती ओठात होती ती मनात होती आठवणीत साठलेल्या कणाकणात तीच होती.

निरर्थकाची डायरी ७

निरर्थकाची डायरी--       पुर्वी सापाचा धक्का लागून तो मागून येतो अशी समजूत मनात पक्की होती, तेव्हा माहीतीतला एक माणूस असा धक्का लागल्याचा संशय आला तर स्वत:च्या घरी न जाता शेजाऱ्यांकडे जावून गप्पा मारत बसे, म्हणजे साप पाठून आलाच तर या शेजाऱ्यांच्या घरी यावा.       ही वृत्ती आजही दिसते. मला आठवतयं भावाने एप्रिलमध्ये लस घेतली, लसीकरण आणि करोना टेस्ट शेजारीशेजारी होत होती, एक पॉझिटिव्ह म्हातारबुवा मुद्दाम लशीसाठी आलेल्या लोकांत फिरत होता,त्यांच्या तोंडावरुन हात फिरवत होता.        कोरोनाचा संशय आलेली काहीजणं मुद्दाम दुसऱ्यांच्या तोंडाजवळ तोंड नेवून बोलताना दिसतात ती हीच वृत्ती.          आपण या वृत्तीला टाळू शकत नाही,तोडून टाकू शकत नाही तेव्हा आपल्या हातात एकच असते या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, फिजिकली आणि मेंटली सुद्धा, नाहीतर वृत्तीची आणि विषाणूंची लागण झालीच म्हणून समजा.

लिटील चॅम्प- छोटीसी बात

बघितलत का काकू, कालची ती चिमूरडी मुलं आज परिक्षकाच्या खुर्चीवल बसलीयत, काहीच कसे वाटत नाही त्यांना ?     अग, अभयंकरणी तुम्हीच न त्यांच्यातली प्रतिभा बघून त्यांना भरभरुन एसएमएस केलेलेत.        अहो काकू, प्रतिभा वेगळी, आयुष्यभर शिकावं लागते तेव्हा कणभर विद्या मिळते हो.          त्या छोट्या मुलांना त्यांची प्रतिभा, त्यांची शिकण्यातली जिद्द आणि प्रतिभा बघून निवडायचे असते हो. पण आता तुम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नाही कारण त्यांना मत देताना तुम्ही त्यांची जात, त्यांचे गाव, वेळ पडली तर त्यांचे लहान वय बघून निवडून देता.           ते सारेगम चालू होतं तेव्हा मी गेलेला भाच्याकडे गावाला, आपल्या गावातील मुलगी म्हणून त्या गरीब शेतकरी लोकांनी वर्गणी जमवून मेसेज करताना मी बघितलेय.           दंडवते काकू, सगळीच काही अशी नसतात हो, काही थोडीजणं तरी गाणं ऐकून मतदान करतात. पण काकू बघा की, त्यांच्या कॉमेंट्समधून अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, महेश काळे यांची झलक स्पष्ट दिसतेय.       ...

बोधकथा

जंगलचा राजा आजारी पडला, थकला, उपासमार होवू लागली,शेवटी त्याने शक्ती एकवटून एका काळविटावर झडप टाकली पण झाले उलटेच, झटपटीत काळविटाची शिंग लागून तो जखमी झाला,एक शिंग तर त्याच्या डोळ्यातच घुसले.                  दुखण्यातून बरा झाल्यावर त्याने शिंग बंदीचा हुकुम काढला, जंगला लहानमोठ्या कोणत्याही प्रकारच्या शिंगाला बंदी. ज्यांना शिंग आहेत त्यांनी शिंग काढून टाकावीत.                  सगळे शिंगवाले प्राणी जंगलचे राज्य सोडून बाहेर निघून गेले.                  या गडबडीत एका सशाने आपली सावली बघितल, सावलीतले कान बघून तो घाबरला. त्याच्या मनात आले "शिपाई रानकुत्रांना हे कान शिंगंच आहेत असे वाटले तर ?"                  घाबरुन तो ससा शेजारी राहणाऱ्या रातकिड्याकडे गेला आणि म्हणाला," मित्रा, मी अखेरचा निरोप घ्यायला आलोय, मी हे जंगल सोडून चाललोय".                    किड्याने विचा...
वेगवेगळी फुले उमलली तीच्या गोऱ्या गालावरी, दरवळतो सुगंध तीच्या मलमली कुंतलावरी. शोधतो नभांतरी मी आठवणींची पाखरे, उमलते हृदय माझे मुग्ध त्या चाफ्यापरी. शोधतो मी अंतरी  पुन्हा पुन्हा ती छबी, सुटून जाते वीण  नात्याची हातातूनी. ईश्वरा तू स्मृती अशी पुन्हा कुणा देवू नको, आपुलकीच्या सुगंधाला कुपीमध्ये कोंडू नको.

दु:ख

मने,       प्रत्येक जखम बांधून ठेवायची नसते, काही जखमा एवढ्या साध्या असतात की मोकळी हवाच तिच्यावर मलमाचे काम करते.       मने, दु:खाच्या गाठोड्यात स्वत:ला बांधून घेतल्याने दु:ख कमी होत नाही तर ते वाढतच जाते. आनंदी क्षणाची छोटीशी झुळूकही दु:खावर उतारा ठरु शकते.          प्रत्येक दु:खावरती पेनिसिलीन लावावे लागत नाही, कधी तुपाचे नाजूक बोट ही दुखणे कमी करते.        मने, हाताला खुपणारे कुस कधीतरी निघतेच , कधी मुद्दाम काढून टाकवे लागते, कधी आपोआप कामाच्या ओघात निघून जाते,कधी आजीच्या मायेच्या हळूवार स्पर्शानेही निघते. ते चांदण्याचे हात आपल्या आजूबाजूला असतातच वेगवेगळ्या रुपात फक्त ते हात हातात घ्यावे लागतात.         मने, दु:खाच्या ओघात का वहावत जावे, त्या प्रवाहात सुद्धा खंबीर रहावे दगडासारखे अविचल,दु:खाचा प्रवाह भेदत. बघ आनंदाचे कणकण वाहत येवून आजूबाजूला जमा होईल.

निसर्गाची जपणूक आणि आपण

प्रसिद्ध निसर्गसंशोधक जॉन मूर म्हणाले होते," तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही वाळवंट दाखवणार का ?            डार्विनचा उत्क्रांदीवाद सांगतो, "उपयोग नसलेल्या गोष्टी नष्ट होवून जातात."            निसर्ग अभ्यासक अमित टिल्लू म्हणतात," तुम्ही काहीच न करणे हेच खुप काही करण्यासारखे आहे".             आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे,आपल्याला आपले आयुर्वेद जपायचा असेल तर आपल्याला आपली वनश्रीसृष्टी जपावीच लागेल.               झाडांना,फुलांना,पानांना जपणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे नव्हे,तर त्यांच्या जवळ जाणे. आपल्या मुलांना त्यांची ओळख करुन देणे, त्यांच्या उपयोगाबद्दल, त्यांचा सांस्कृतिक महत्वाबद्दल मुलांना माहीती करुन देणे,तरच त्यांना त्यांच्याबद्दल ओढ निर्माण होईल.               आजच अशी परिस्थीती आहे की नेहमीच्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती ओळखता येत नाहीत. आपटा आणि कांचन यातील फरक  दरवर्षी कानीकपाळी ओरडून सांगावा लागतो.   ...

निसर्गायण

परवा काका म्हणाले " चालत रहा, चालत रहा, चालणाऱ्याला निसर्ग भेटतो, एकदा स्वत:ला अवकाशात बंदिस्त करुन टाकले की निसर्गसुक्त घरातच आळवत बसावे लागते.            स्वामींच्या भाषेत बोलायचे तर " एकदा बंदिस्त अवकाश स्विकारला की त्याला तुरुंग समजायचे की मानसिक उब देणारे देवालय हे आपल्या हातात असते."              अवकाश तरी कुठे निसर्गापासून वेगळा असतो, तो ही निसर्गाचाच एक अंश. तिथेही सुर्य असतोच,कधी दाहक तरी कधी उबदार, हवाहवासा वाटणारा, आत कुठला ऋतू जपायचा हे आपल्याच हातात असते.                तिथेही चंद्र असतो पौर्णिमेचा,शितल चांदणे देणारा.                 तिथेही हवाहवासा वाटतो हिवाळ्यातला गारवा,सफरचंद पिकवणारा.                तिथेही इंद्रधनुष्य उमलून जाते, भरलेला मेघांच्या वर्षावा पाठोपाठ.                तिथेही असते वृक्षांची सावली, वेलींची प्रफुल्लता, फुलांचा सुगंध आणि कोव...

एक क्षण

एक क्षण असतो मुक्त बोलण्याचा एक क्षण असतो मौन पाळण्याचा , नको टाळू तू मौनातले इशारे एक क्षण असतो जीव लावण्याचा. एक क्षण असतो शब्द वाढण्याचा एक क्षण असतो शब्द तुटण्याचा, नको घोळवू तू मनात तेच सारे एक क्षण असतो आपुलकी जपण्याचा. एक क्षण असतो तुटून पडण्याचा एक क्षण असतो स्वत: सावरण्याचा, नको हात खेचू तुझा तू रे मागे एक क्षण असतो उभे राहण्याचा. एक क्षण असतो दु:खी बनण्याचा एक क्षण असतो सुखाचाबिखाचा, नको स्वार होवू दु:खाच्या लाटेवर एक क्षण असतो आनंद लुटण्याचा. एक क्षण असतो निघून जावयाचा एक क्षण असतो पाय रोवण्याचा, नको रे मना निसरड्यावरी धावू एक क्षण असतो सुख भोगण्याचा

ऑक्सिजन-वृक्ष आणि प्रदुषण

मने,      झाले के तुमचे वृक्षारोपण करुन, यंदा ऑक्सिजनचे महत्व प्रकर्षाने लक्षात आले त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम यंदा जरा जास्तच चढाओढीने राबवले जातातायत. जून-जुलैमध्ये अतीपावसाच्या दिवसात लावलेली रोपं किती तग धरतात हा एक संशोधनाचा विषय आहे.        मने, फक्त वृक्षारोपण केलं की आपण ऑक्सिजनच्यासाठी काही करण्याची गरज नाही हा विचारमात्र पुर्णपणे चुकीचा आहे.         पृथ्वीवरचा पन्नास टक्के ऑक्सिजन तर समुद्रापासून मिळतो, समुद्रातील एकपेशीय वनस्पती हा ऑक्सिजन आपल्याला पुरवतात. या वनस्पतींचा सर्वांत मोठा शत्रू आपणच नकळत त्यांच्यापर्यंत पोचवत असते.           जवळपास ६० हजार वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स समुद्राच्या पाण्यात सोडली जातात, आपण कचरा म्हणून टाकलेला एक वर्तमानपत्राचा कागद, एक निरुपयोगी ठरलेली औषधाची गोळी, सिंन्थेटिक कापडाचा एक तुकडा, एक प्लॅस्टिकची पिशवी हे सर्व केमिकल नदीमार्फत, गटारामार्फत समुद्रापर्यंत पोचवले जाते. त्या प्रदुषणामुळे समुद्रातील या वनस्पती संकटात सापडतायत पण हे सर्व समुद्र आपल्याला साभार...

कधी वाटते

कधी वाटते तुझेच व्हावे तुझ्या अंतरी स्वत: वसावे, तुझे ओठ,तुझाच श्वास गीत होवूनी जगात यावे. तुझीच आठवण बनून जावे तुझ्याच आठवणीत सदा रमावे, तुझ्याच साठी,तुझ्याच करता जीवन लेवून पुन्हा जगावे. तुझे चांदणे सदा उशाला तुझा सुगंध असो श्वासाला, तुझ्यासाठी, तुझ्या मिठीत भ्रमर होवून बंदी व्हावे.

मनूला पत्र

मने,              सगळीच बोलतात "दुरुन डोंगर साजरे" दुरुन डोंगर कितीही रेखीव दिसत असले तरी ते दिसतात एकसुरीच, हिमालयाच्या शिखरांसारखी काही शिखरेच दुरुनही सुंदर दिसतात,त्यांच्यापासून दुर राहूनच त्यांचे सौंदर्य,भव्यता आदरानी अनुभवावी,नाहीतर बाकीच्या डोंगराजवळ जायला हवे, तरच त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारे निर्झर आणी त्यांनी ल्यालेली विविध रंगी वसने अनुभवायला मिळणारच नाहीत.              माणसांच पण असंच असतं काही माणसंच असतात दिपस्तंभासारखी,त्यांच्या नुसत्या असण्यावरुन आपला मार्ग ठरवावा अशी.              बाकीची माणसं मात्र जवळ जावून अनुभवावी.किती विविध रंग असतात स्वभावात लपलेली,खेळावी कधीतरी रंगपंचमी या रंगांचीही,निर्माण होईलही एक नवीनच लोभसवाणी शेड तयार.              निसर्गाकडे जाण्याच्या नादात माणूस हा पण निसर्गाचा अविभाज्य घटक आहे हेच आपण विसरुन जातो मने, जवळ असणा-या माणसांना विसरून जावून दुस-या माणसांना निरखून बघण्यात एवढे गर्क असतो की आपल्या लक्षातच...

मनाची शक्ती

#अलक मामी जेवल्यावर सुगंधीत मसाला पान खात बसली होती, "हा छान वास कसला ?" या प्रश्नाचे चेष्टेत मिळालेले तंबाखूचा हे उत्तर ऐकताक्षणी बसल्याजागी अंग टाकून दिले. गरगरतेय,चक्कर येतेय म्हणून लोळू लागली. आजच्या कोरोना लाटेतही घाबरलेल्या संशयग्रस्त मनाच्या पाठी आपले शरीर फरफटत जाताना आपण बघतो. मन खंबीर तर शरीर खंबीर.

सल

#अलक सकाळी उठल्यावर त्याने मोबाईल उघडला, आज जागतिक पर्यावरण दिन. त्याला लहानपणी खेळायचा तो उंबराचा पार आठवला,ती चिंच तीच्या गाभुळलेल्या चिंचा मुद्दाम मैत्रीणींसाठी शाळेत घेवून जायचा. ते नीर फणसाचे अवाढव्य झाड, त्याच्या फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावरचा सवंगड्यांचा धुडगूस. तो रायवळ आंब्यावर दगड मारुन कैऱ्या पाडण्याचा खेळ. पातेरं पडतं म्हणून तोडून टाकलेलं एक-एक झाड आठवलं. खिशात पाकीट टाकून, गाडी घेवून नर्सरीत पोचला. गुलमोहर,सोनमोहर,,रेन ट्री, बदामाची झाडं आणून कंपाऊंडच्या बाहेर रस्त्याच्याकडेला लावून टाकली. ती झाडं आता याचा मनाच्या सलावर मलम बनून पातेरं सांडत राहतील, पर्यावरण दिनाच्या फोटोत मिरवण्यासाठी

संध्याकाळ

नको वाटे संध्याकाळ शब्दांचेच वाटे ओझे, दिसभर पेरलेले भुतं होवून मनी नाचे. नको वाटे संध्याकाळ मौनाची ती कातळवेळ, आपुलकीच्या उत्साहाला काळोखचे ग्रहण. नको वाटे संध्याकाळ मावळतीचे रंग दावी, मनीच्या डोहावर व्याकुळतेची शेवाळ येई. नको वाटे संध्याकाळ रातीची ती पाऊलवाट, नित्य नव्याने जायचे त्या अनोळखी जंगलात.

निरर्थकाची डायरी ६

निरर्थकाची डायरी -             आपल्याला एखादे फुल,फळ आवडते,आपण त्याचे बी मिळवून रुजत घालतो. ते रुजवताना आपण आपली सोय बघतो. रोप रुजून येते आपण काळजी घेतोच.                आपण त्या रोपाच्याच एवढे प्रेमात पडतो की आपल्या सोयीनुसार रुजवलेले ते रोप त्याच्या आवश्यकतेनुसार योग्य जागी लावायचेच विसरुन जातो.                  प्रत्येक झाडाला त्याची त्याची स्पेस हवी असते, त्यांची गरज वेगवेगळी असते.                    ती योग्य स्पेस, योग्य वातावरण मिळाले नाही तर ती खुरटतात किंवा ती जोरदार वाढली तरी त्यांची वाढ आपल्यालाच त्रासदायक ठरते.                     जे झाड आपण जपले तेच तोडून टाकण्याची वेळ आपल्यावर येते.                      प्रत्येकाला हवी ती स्पेस योग्यवेळी मिळेल हे बघितलं तरच हे साहचर्य आनंददायी ठरते.

निरर्थकाची डायरी ५

निरर्थकाची डायरी -                  छोटे-मोठे व्यवसाय करणारे,रस्ताच्या बाजूला फुलं,फळं, भाजी विकणारे, आपल्या धंद्यासाठी लागणारे काही सामान पुठ्ठे,फळीचे तुकडे, छोट्या टोपल्या तिथेच बाजूला ठेवून धंदा बंद करुन घरी जातात.                 त्या वस्तू किंमतीने कमी असतात पण त्यांच्या वेळवर त्या त्यांच्यासाठी अनमोल असतात.                आजकाल काहीजणं या वस्तू उचलून घेवून जाताना दिसतात. या उपयोग नसलेल्या वस्तू नंतर फेकून दिल्या जात असतील. पण फुकटचं मिळालं या क्षणाभराच्या समाधानासाठी त्या छोट्या धंदेवाल्या मानसिक त्रास दिला जातो.                 अशा उसन्या समाधानाने खरी मानसिक शांती कधीच मिळत नाही हे त्यांना कळतच नाही.

वाफ,बुरशी, म्युकरमायकोसिस

बुरशीची उत्पत्ती दमट ठिकाणी होते मग वाफ घेण्यामुळे दमटपणा वाढतच असेल.            एक डॉक्टर छद्मीपणाने वैद्यांना म्हणाले होते, " हमारे पास अँण्टीबायोटिक्स है, आपके पास क्या है" ?              त्यावर त्या वैद्यांनी सांगितले होते," ज्या वातावरणात जंतूंची उत्पत्ती- वाढ होते ते वातावरण तयारच होणार नाही याची काळजी आयुर्वेद घेते".

असे ही वाहवत जाणे

विचार करुन करुन डोक्याचे भजे झालेय.        हिमालया ही कंपनी आयुर्वेदिक औषधे बनवते, तिची सेप्टिलीन किंवा लिव ५२ वैद्यांपेक्षाही ॲलोपॅथीचे डॉक्टर जास्त वापरतात. म्हणून ती आमची.         पण ती स्वदेशी कंपनी नाही,तीचा मालक भारतीय नाही,आपण तर स्वदेशीचाच वापर करायचा.          ती स्वातंत्र्या आधीपासून भारतात प्रॉडक्शन घेतेय,ती आपलीच भारतीय.           पण तीचा मालक तर हिंदू नाही  मग त्या कंपनीची औषधं बॅन केलीच पाहिजेत.            छे, काही समजतच नाहीये,झोपून जावे हेच चांगले.             गुड नाईट.

निरर्थकाची डायरी ४

निरर्थकाची डायरी - बुद्धी भ्रम करता आला पाहिजे, "मी बोलतो तेच अंतिम सत्य" हे श्रोत्यांच्या मनावर बिंबवतो तोच उत्तम व्याख्याता, यशस्वी बुवा, कुटिल राजकारणी.

निरर्थकाची डायरी ३

निरर्थकाची डायरी-               "कॅरीबॅगेतली कडधान्याची पॅकेट्स काढून त्याच कॅरीबॅगमध्ये भाजी भरुन फ्रीजमध्ये ठेवणे", एवढे सोपे असते का त्वचारोपणाची प्रक्रिया? किंवा          "अंड्यांच्या ट्रे मधले नासके अंडे काढून टाकून त्या रिकाम्या जागी दुसरे अंडे ठेवणे", एवढे सोपे असते अवयवांचे प्रतिरोपण?            व्हॉट्सअप फॉरवर्ड्स वाचून अनेकांचा नक्की असाच समज झाला असणार.              शरीर बाहेरुन आलेली कोणतीही गोष्ट सहजासहजी स्विकारत नाही, प्रतिकारशक्ती त्याला हाकलून काढायचा प्रयत्न करते.              आमच्या गावातील नानांची देहदानाची इच्छा असूनही इकडे ती सोय उपलब्ध नाही म्हणून नोंदणी करता आली नाही.              एटीएस ही कंपनी सर्वात मोठ्या प्रमाणात कृत्रिम त्वचेची निर्मिती करते. वैद्यकीय किंवा इतर कारणांनी लहान मुलांची सुंता केली जाते,त्या छोट्याशा तुकड्यापासून क्रिकेट ग्राउंड एवढी त्वचा निर्माण ह...

निरर्थकाची डायरी २

निरर्थकाची डायरी - कोणाकडून काय घ्यावे.... सरड्याकडून रंग बदलण्याची कला. सापाकडून उलटे फिरण्याची,डूख धरण्याची कला. बेडकाकडून कठीण प्रसंगात गायब होण्याची कला. किड्यापासून स्वत: भोवती कोश बनवण्याची कला. कासवापासून संकटाच्या वेळी लोकांच्या नजरांपासून लपून बसण्याची कला. खेकड्यापासून पाय ओढण्याची कला. मुंगीपासून अविरत ध्येयाकडे कणाकणाने सरकत राहण्याची कला. सातभाई पक्षांकडून घोळका करुन कर्णकर्कश आवाजात गोंगाट करण्याची कला. वाळवी कडून आतून पोखरत राहण्याची कला.

निरर्थकाची डायरी १

निरर्थकाची डायरी               छोटं मुल कागदावर रेघोट्या ओढतं, त्याला काही अर्थ नसतो, कला नसते पण आईच्या नजरेला मात्र त्या फुलं,अक्षर,तर कधी देवबाप्पाही दिसतो.               तसंच हे अर्थहीन लिखाण, एका अनामिकाच्या डायरीतले. निव्वळ टाईमपास.                 निरर्थकाची डायरी -          वाऱ्याला पाहून दिशा बदलणे योग्य असते असे सगळेच म्हणतात पण ते फक्त तग धरून राहण्यासाठी. जी झाडं वादळी वाऱ्यात दिशा बदलतात ती कमजोर झालेली,झोडपली गेलेलीच दिसतात.        जी झाडं वाऱ्यातही ठाम राहतात ती महावृक्ष म्हणून ओळखली जातात. ती स्वत:चा आधार स्वत:च निर्माण करतात ती वटवृक्ष म्हणून पूजनीय ठरतात.        प्रत्येक वेळी क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपले वागणे बदलले तर आपले असे काहीच उरत नाही.         आपल्या रस्त्यावर, आपल्या विचारावर, आपल्या वागण्यावर ठाम असणे हेच मनाला खरे समाधान मिळवून देते.

मनाची शिट्टी

मने,           प्रेशर कुकरची शिट्टी कशी काम करते तुला माहीतच आहे. कुकरमध्ये प्रमाणाबाहेर वाफ कोंडली जावून त्याचा स्फोट होवू नये म्हणून ही शिट्टी.           माणसाच्या मनालापण अशी एखादी शिट्टी बसवली असती तर ? किती सहजतेने कोंडलेले मन मोकळे झाले असते.           पण नीट बघितले तर मनालासुद्धा अशी शिट्टी असतेच. कधी एखादे ठिकाण माणसाच्या मनावरचा ताण कमी करते, कधी एखाद्या माणसाचा सहवास,  कधी एखादे हलकेसे स्मित, कधी एखादा फोन कॉल मनावरचा ताण कमी करतो.           काल सहज छोट्या बहिणीशी बोलताना जाणवले, भडाभडा कॉलवरती बोलत होती, जणू गेल्या पाऊण महिन्यात मनात कोंडलेल्या भावनांपासून मुक्त होतेय, हे चक्क जाणवत होते.            खरंच मनाला तणावमुक्त करु शकणारी माणसं, ठिकाणं जपली पाहिजेत, काहीजणं आपल्यासाठी या शिट्टीची भुमिका बजावत असतील तर काहीजणांसाठी आपणही त्याच भूमिकेत असू.           सगळं काही बोलून मोकळं होता आलं पाहिजे. तेवढेच दुसरं बोलत असतान...
मी कविता केली,  अगदी चित्रावरती कविता केली, आधी कविता रागवली मग चित्रा कावली. आता ती कविता स्मृती बाहेर फेकून दिली, त्यामुळे आनंदी वृत्ती  पुन्हा एकदा उफाळून आली. ही कला सर्वांनाच साधत नाही. ही उपासनेची समृद्धी सगळ्यांच्या आयुष्याला ज्योती बनून उजळवत नाही.

रितेपण

तुझं रितेपण माझ्या रितेपणाहून मोठं आहे, माझ्या रितेपणात तू आहेस तुझं एकटं एकटंआहे.

अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

मने,      आज अक्षयतृतीया, कृषीसंस्कृतीतील पेरणीचा दिवस, आज जे जे पेरु ते सहस्त्र मात्रेने परत मिळते. आजच्या दिवशी पावसाळी भाजीपाल्याचे बी पेरले जाते.       आज गरज आहे ती आरोग्याची, इम्यूनिटीची, त्याचे कणभर बिजरोपण आज आपण आपल्या दिनचर्येत करु,आणि प्रकृती आपल्याला भरभरुन परत करेल हा विश्वास मनी बाळगूया.      आरोग्य, विश्वास,सुखसमृद्धी अक्षय टिकू द्या या प्रार्थनेसह सर्वांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा.
आपली संस्कृतीच विरोधाभासाने भरलेली आहे, आस्था म्हणून आंधळेपणाने संस्कृतीच्या साखळीला गुरासारखे बांधून घेण्यापेक्षा,डोळसपणाने त्यातील कमकुवत कड्या दूर सारुन ती अभिमानाने धारण करणे हाच समंजसपणा.

मदर्स डे

"आज मदर्स डे आहे, मातृदिन तर पिठोरीलाच". असे कोणीही लिहीलेले दिसले नाही.           आभाळ कोणत्याही कॅलेंडरचे किंवा पंचांगाचे,    दिवस-रात्रीचे  मोहताज नसते, ते कायम तुमच्या सोबतच असते, आईच्या मायेसारखेच.  अगदी तुम्ही तुम्हाला तुमच्या कोशात गुरफटून घेतले असल, तुम्हाला दिसत नसले तरीही.            आभाळ कवेत घेता येत नाही म्हणतात तसेची आईची माया ही, ना ती शब्दात मांडता येत, ना एका रुपात दाखवता येत.              जन्म देणाऱ्या आई व्यतिरिक्त असंख्य माय तुमच्यावर माया करत असतात, लळा लावत असतात, तुमचे हित चिंतत असते.                "आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे", अशी प्रार्थना करुन त्या अफाट आभाळात एकरुप होण्याचा प्रयत्न करायचा, कोणावरतरी तीच माया,प्रेम आपल्या छोट्याशा मुठीत उधळून टाकण्यासाठी .

पावसाचा ऋतू आला

आठवणींनी तुझ्या बघ आभाळालाही कढ आले, बघून भुईमधूनी आशेचे कोंब रुजले. मेघांचे बघ नभात नृत्य चाले, धरतीच्या कायेवरती धुळीचे रोमांच उठले. पावासाचे दिन बघ परत जवळ आले, सृष्टीने नटून  नववधूचे रुप ल्याले.

अबोल प्रेम

अधीर प्रेम माझे पापणी आड दडलेले, तिच्या एका नजरेने  ओठांवर सजलेले.

आठवण

आठवणीचा ऋतू जेव्हा जेव्हा पालटतो, तेव्हा  तेव्हा जीवनात अनखो रंग भरतो. डोळ्यांमध्ये आसू नाहीतर गालावरती लाली, प्रत्येक ऋतूची  कहाणी निराली. ऋतू बदलत असताना आपण सावरायला हवं, काही घट्ट धरताना काही सोडायला हवं. कोणता रंग जपायचा आपल्या हातात नसतं, आपण किती जपलय यावर जीवन आपलं ठरतं.

गुढीपाडवा शुभेच्छा

हस्तक्षेप-दुसऱ्या ग्रहावरील सजीवांचा

कोणीही उगाच गमजा मारुच नये,रॉकेट सायन्सवाल्यांंनी पण. प्रत्येक सायन्सला लागणारे ज्ञान,  तंत्रज्ञान, साधने वेगवेगळी असतात.         रॉकेट सायन्सवरुन मनात आले, पृथ्वीवरची माणसं आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर दुसऱ्या ग्रहांवर जायचे प्रयत्न करत आहेत, त्याचे मुख्य कारण बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि कमी पडत जाणारी साधनसंपत्ती.           त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या कोणत्या प्रगत ग्रहावरील सजीवांनी पृथ्वीवरच्या माणसांना पृथ्वीवरच रोखायचा प्रयत्न सुरु केला असेल तर ?

संध्याकाळ

नको वाटे संध्याकाळ शब्दांचेच वाटे ओझे, दिसभर पेरलेले भुतं होवून मनी नाचे. नको वाटे संध्याकाळ मौनाची ती कातळवेळ, आपुलकीच्या उत्साहाला काळोखचे ग्रहण. नको वाटे संध्याकाळ मावळतीचे रंग दावी, मनीच्या डोहावर व्याकुळतेची शेवाळ येई. नको वाटे संध्याकाळ रातीची ती पाऊलवाट, नित्य नव्याने जायचे त्या अनोळखी जंगलात.

पाठांतर

"पाठांतर हे खिशात खुळखुळणाऱ्या रोकडीसारखे आहे" हे वाचल्यापासून इंग्रजी डिक्शनरी किंवा मराठी शब्दाकोश उघडताना एटिएममध्ये कार्ड सरकवत असल्यासारखे वाटते.
जरा सी हवा बदल जाती जरासा पेड़ झुक जाता। तो मुमकीन था ये पत्ते हमेशा के लिए शाख़ से ना बिछड जाते।।

मनःस्वास्थ

पुलंचे "दाद" पुस्तक वाचताना एक वाक्य वाचनात आले, वेंडेल होम्स या विचारवंत आणि वैद्यकशास्त्रज्ञाने लिहिलेय.               "रोग बरा होणे ही एक जिवंत प्रक्रिया आहे. ती मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. युद्धात विजय मिळवणाऱ्या सैनिकांना झालेली जखम लवकर बरी होते, पण तसलीच जखम जर हरलेल्या सैनिकाला झाली तर ती मारक ठरते."               आत्ताच्या ह्या कठीण परिस्थितीत मनःस्वास्थ्य जपले पाहीजे हेच खरे.

आठवणी

रात्री बेरात्री डोळ्यांमध्ये रेंगाळते, आठवणीचे फुलपाखरु मनात भिरभिरत राहते.

मी ही वाचत सुटलो त्याची गोष्ट.

माझा आवडता लेखक.....           खरंच असा एकच एक लेखक येईल सांगता. वाचनाची सुरवात झाली ती चांदोबा आणि अमृतच्या आजोबांनी जपलेल्या अंकांपासून. गाडी पुढे सरकत जादूचे दिवे,उडत्या चटया हे स्टॉप घेत भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज, खजिन्याची बेटं असा खडतर मार्ग शोधत होती. शाळेतल्या बाई या सोबतच विज्ञान,इतिहास असे वेगवेगळे नवलाईचे प्रदेश दाखवत होत्या.           कधीतरी सुशींच खजिना आणि मंत्रजागर ही पुस्तकं हाती लागली आणि सुशी नावाच्या बेटावर असंख्य दिवस नवलाईची इंद्रधनुष्य अनुभवली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,द.मा.मिरासदार, द.पा.खांबेटे हे झुळझुळणारे झरे तहान भागवत होतेच.           छोट्या गावातल्या छोट्या वाचनालयामुळे एकाच ठिकाणी अडकून राहणे शक्यच नव्हते. श्रिकांत सिनकर, बा.सि.अष्टिकर, व.कृ.जोशी हे गुन्हेगारीचे जग हाताला धरुन दाखवत होते तेव्हाच प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईतील झगमगाट आणि दिवसाच्या झगमगीत मुंबईतील काळाकुट्ट अंधार अधोरेखीत करत होते.           व्यंकेटेश माडगुळकर परवचा,सरवाच्या माध्यमातून स...

फुल्स डे-एव्हरी डे

जशी देवाची भक्ती आपण बारा महिने करत असलो तरी वर्षातील एक दिवस निवडून आपण त्या भक्तिचा उत्सव साजरा करतो. त्याचप्रमाणे वेडेपणाचा वसा आपण कायमस्वरूपी स्विकारला असला तरी त्याचा उत्सवही एक दिवस साजरा करतो. वेडेपणाचे गंध अविरत उगाळून त्याचा लेप आपल्यावरच करुन आपली निर्मळ वृत्ती आपण झाकून टाकतो.  या वेडेपणाच्या जागतिक उत्सवाला हार्दिक शुभेच्छा, हा उत्सव अनंत काळापर्यंत साजरा करण्याची शक्ती आपल्याला लाभो हीच प्रार्थना.

साथ पानाची

पानाची साथ सुटते झाडापासून. वेदना तर होत असतीलच दोघांनाही. पण झाडं स्थिर राहतं भक्कमपणे पाय रोवून.        पान मात्र भिरभिरते,वाऱ्यावरती, मायेच्या उबेच्या आशेने धरतीकडे धावते.काहींच्या नशीबी असते ही उब, काहींच्या नशीबी मात्र जळून जाणे आठवणींच्या वैशाखवणव्यात.        माणसांनी झाडा सारखं व्हावे, स्थिर,आत्ममग्न,त्याला सृजनाची साथ असते हे खरेच, म्हणूनच ते परिपुर्ण असते,आप्तांच्या संगतीत.         पानं,कळ्या,फुलं,फळं मिरवीत,आनंदाने डोलत.

आप्पा आणि बाप्पा

आप्पा आणि बाप्पा जून्या आठवणीत रमले होते. त्यांनी लिहीलेली, संकलित केलेली जूनी पुस्तकं चाळत उजळणी चालू होती.         बाप्पा एकदम आप्पाला म्हणाले," चल,कुछ तुफानी करते है, कलयुग का नया महाभारत रचते है".          आप्पा म्हणाले बाप्पांना," या वेळी मात्र मी एकटा सलग गोष्ट सांगणार नाही,पृथ्वीवरच्या सामन्य माणसांनाही संधी देवूया,गोष्टी रचायची आणि गोष्टी पुढे ढकलण्याची ही".            त्यावर बाप्पा ही म्हणाला," असे असेल तर लिहीलेलं,वाचलेलं आणि फॉरवर्ड केलेली गोष्ट,तीचा मतितार्थ समजून घेण्याची अट ही कोणावरच नसावी".              योजना ठरली आणि जन्म झाला,कलियुगाच्या महाभारताचा अर्थात व्हॉट्सअपचा.               दोघांचे ठरले सर्वात जास्त मतितार्थ न समजता केले जाणारे, परस्पर विरोधी अर्थ असणारे दोन मेसेज शोधायचे आणि नंतर माणसांना कायमचे यात गुंतवून ठेवायचे. अट फक्त एकच, " मेसेजेचा ओघ थांबता कमा नये, जेव्हा तो थांबेल तेव्हा हे व्हॉट्सअपसुद्धा बंद होईल".  ...

सुख-दु:ख

सुख नव्याने सावरता वेदनेचा शेला हाती, दु:ख भरल्या दिवसाची छोटीशी पहाट होती. तू देतो म्हणूनी मी हात पुढे केला, चांदण्याचा हातातून ही सूर्य हाती आला. जे जे होते माझ्यापाशी ते ते सुटून गेले, सुखाच्या रस्त्यावरती दु:खाचे गाव लागले.

पन्नाशी

  सोळावं वरीस धोक्याचं म्हटले जाते ते मुलीसाठी-स्त्री करीता खरे असेलही पण पुरुषांच्या आयुष्यातील धोक्याची वर्ष ही पन्नाशीच्या आसपासची.          त्यावेळी अजूबाजूची माणसं आपल्याला जगात गर्क असतात, पुरुषमाणुस कात टाकायला आलेल्या सापासारखा सुस्तावलेला असतो.            पाण्याअभावी सुकत चाललेल्या झाडांची मुळे जशी ओलाव्याच्या शोधात असतात तशा या व्यक्ती आपलकीच्या, मायेच्या शब्दाच्या शोधात असतात. पैशापेक्षा माणसाच्या साठवणुकीचे महत्व कळते ते याच वेळी.          एवढ्या वर्षाच्या वाटचालीत असंख्य हितशत्रू खात्यात जमा झालेले असतात.           नाटकांमध्ये वर्षानुवर्षे चिल्लर काम करणारा नटही "मी गणपतराव बेलवलकर लिलया उभा करीन" या घमेंडीत असतो, तशीच ही माणसं ही मी कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे हाताळू शकतो या अहंगंडाला कुरवाळत असतात.           अशा वेळेला दगडाला शेंदूर फासणारी आजूबाजूला वावरतच असतात, अती झाला की दगडाला फासलेला शेंदूर ही कधीतरी ओघळतो तशीच ही माणसं ही ...
विरुन गेलेले शब्द मनात घोळवत राहतं कुणीतरी संपलेल्या मैफलीची भैरवी आळवत राहतं कुणीतरी, बुडून गेलेल्या जहाजाच्या शिडामध्ये वारा भरण्याची वाट पहात राहतं कुणीतरी.

ऋतू

ज्याने त्याने ल्यावे आपापले ऋतू उसन्या उबेवरी रुजू नये. आपुलेच मुळ करावे बळकट, उसन्या आधारा धावू नये. आपुला आनंद आपुल्याच गाठी उसन्या शब्दा पोटी फुलू नये.

राष्ट्रीय विज्ञान दिन

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चेंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी गेली कित्येक वर्ष म्हणजे १९८७ पासून विज्ञान दिन साजरा केला जात असला तरी सोशल मिडीयाच्या ताकदीने सर्वसामन्य लोक या दिवसाशी जोडली गेली.          २८ फेब्रुवारी १९२८ याच दिवशी रमण यांंनी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला.          रामन इफेक्ट म्हणजे काय ?          आपण दिवाळीत बघतो, घराबाहेर फटक्यातील बॉंबचा जोरदार स्फोट झाला की घरातील लहान मोठी भांडी कंप पावतात व त्यांचा नाद आवाज येतो,हा आवाजाचा परिणाम. पदार्थातील रेणू अत्यंत संवेदनशील असतात,प्रकाशाला कंपने असतात. वस्तूवर प्रकाश झोत पडला की तर वस्तूतील रेणू कंप पावते, क्षणानंतर ती कंपने आत घेतलेला प्रकाश परत बाहेर टाकतात,प्रकाशाचे विकिरीण करतात, निमिषार्धात होणाऱ्या या प्रकाशाच्या विकिरणांचे संशोधन रमण यांनी केले हाच रामण इफेक्ट.          प्रत्येक पदार्थातून प्रकाशाचे विकिरण होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.       ...

मी मराठी-

माझ्या मराठीचा टिळा  मी लाविला कपाळी, हिच्या शब्दांचा सुगंध मी कौतुकाचा धनी. इथे जे जे मिळाले त्या फक्त मराठीमुळेच. कोणालाही न बघता,न भेटता जे संचित जमा झाले ते देवी सरस्वतीच्या या दुधामुळेच. कधीकधी चुकीच्या संस्कारांमुळे हे अमृतही नासू पाहात होते पण त्या प्रत्येक क्षणी सरस्वतीची लेकच कान उपटायला आणि धपाटा घालायला पुढे सरसावली. लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी.

अंधश्रद्धा-विज्ञानाच्या सहाय्याने जोपासलेल्या

जाणीवपूर्वक आपल्या समाजात जोपासल्या गेलेल्या वैज्ञानिक अंधश्रद्धा.    अमेरिकेसारखे देश कधीच कुणाचे नसतात , " कापल्या करंगळीवर मुतणार नाही ", असे वर्णन जे कोकणात सर्रास केले जाते ते अमेरिकेसाठी चपखल बसते.   याच अमेरिकेने कधीकाळी कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग सहाय्याने चीन मधील परंपरागत धान्य उत्पादन आणि पशुपक्षी पालनाची काशी करुन आयातीची वेळ आणली होती. चीन त्या अनुभवातून शिकला पण भारतीय "मोडू पण वाकणार नाही" या राष्ट्रीय ब्रीदामुळे कधीच चुकांवरून शिकायला तयार नसतात.   खरं म्हणजे आपल्यासाठीही अमेरिकेचे-पाश्चात्यांचे खेळ नवीन नाहीत, तेथील संशोधक सरकारच्या धोरणांना सोयिस्कर ठरतील असेच निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत.    भारतात पुर्वीपासून वापरले जाणारे शेंगदाणा- तिळाचे तेल अपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भरवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा करण्यात आला, हृदयासाठी धोकादायक असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले गेलेले पाम तेल आणि सोयाबीन तेल इथे रुजवण्यात आले. आत्ताच पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली ही खरे तर संधी होती आपली पारंपरिक खाद्यतेलांकडे लोकांना वळवण्य...

नाते-- जमीन आणि पाण्याचे

मुसळधार पावसाची सर बनून ती धावत येते, रेडकोटचा अडथळा हळूवार हाताने बाजूला सारत चिंब भीजवून टाकते.    आणि    मग निघूनही जाताते ओहोटीचे पाणी बनून, ज्या आवेगाने येते त्याच वेगाने. सोबत किनाऱ्यावरच्या वाळूचे स्वत:चे असते ते असे सर्व काही,घेवून जाते. आधीपासून किनाऱ्यावर उमटलेल्या नक्षीदार पाऊलखुणा उध्वस्त करत. पाणीच ते निःसंग, रंगहीन. समर्पित होणे आणि मुक्त होवून जाणे पाणीच जाणे.    जमीन मात्र होता होईतो अंतरंगात आठवणी जपत राहते, पृष्ठभागावर रुक्षतेचा मुखवटा पांघरुन. 

सोशल लाईफ

माणूस प्रत्येक गोष्टीचा किस पाडण्यात एवढा वेळ व्यर्थ घालवतो, तो करतो कमी बोलतो जास्त.       इथे व्यक्त केलेला प्रत्येक हुंकार, इथे सोडलेला प्रत्येक सुस्कारा, कुठे तरी नोंदवला जात असतो.         सोशल फुटप्रिंट नावाची एक नवीन पायवाट इथे उदयाला येतेल. प्रत्यक्ष घडलेल्या आणि बिघडले नात्यांपेक्षा या आठवणींच्या पाऊलखुणा जेव्हा समोर येतात तेव्हा माणसं जास्त उदास होतात,तोल गमावून बसतात.         इथे किस्से घडतात आणि बिघडतात पण ते बिघडण्यातही तोल सांभाळता आला पाहीजे.          
न बोलता ही प्रेम कळावे अशी असावी स्वच्छ दिठी, मनामनातील द्वैत सरावे अशी असावी सहज मिठी.
नदीला आस लागलेली असते, सुर्याला जावून मिळावे, त्याच्या डोळ्यातील अश्रू बनून त्याच्या सान्निध्यात राहावे.         तप्त सूर्याच्या कल्पनेनीसुद्धा नदीची वाफ होवून आसमंतात हरवून जाते.         वाहत जाणे हा नदीचा धर्म, तप्त उन्हापासून तीला जपणे हा तीच्या आसपासच्या हिरवळीचा धर्म, सागराला मिळून एकरुप होणे हेच नदीचे प्राक्तन.          सरिता सागराला मिळते तेव्हाच ती पुन्हा पुन्हा जन्म घेते.         नदीला अकाली सुकू देण्यापासून थांबवणे तीच्या अजूबाजूच्या हिरव्या निसर्गावर अवलंबून असते तेवढेच आपल्या फायद्यासाठी तिला ओरबडणाऱ्यांच्या मनोवृत्तीवर पण. नदी योग्य वेळी, योग्य प्रकारे सागराला जावून मिळणे यातच खरे हित सामावलेले असते.